Saturday, July 19, 2025
Google search engine
HomeUncategorizedसडक अर्जुनी येथे वाहनांवर कोसळला झाड, दोघांचा मृत्यू, चार जण जखमी

सडक अर्जुनी येथे वाहनांवर कोसळला झाड, दोघांचा मृत्यू, चार जण जखमी

गोंदिया : रस्त्याच्या कडेवरील झाड पुन्हा एकदा वाटसरूंसाठी कर्दनकाळ ठरला असून धावत्या मारुती कारवर झाड पडल्यामुळे विचित्र अपघात घडून दोघांचा जागीच मृत्यू झाला तर चौघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज, बुधवार ९ जुलै रोजी सकाळी ९ ते ९.३० वाजताच्या सुमारास जिल्ह्यातील सडक अर्जुनी येथे कोहमारा-गोंदिया मार्गावरील पेट्रोलपंप परिसरात घडली. वासुदेव खेडकर व आनंदराव राऊत अशी मृतांची नावे आहेत.
आज, सकाळी ९ वाजताच्या सुमारास सडक अर्जुनी शहरात गोंदिया-कोहमारा मार्गावरील पेट्रोलपंप परिसरात कोहमाराच्या दिशेने जात असलेल्या एमएच ३१ सीआर १५४९ क्रमांकाच्या मारुती ओमनी कारवर रस्त्याच्या कडेवरील आंब्याचा झाड पावसामुळे कोलमडून पडल्याने मारुती कारमध्ये बसलेले वासुदेव खेडकर व आनंदराव राऊत या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर चालक गंभीर जखमी झाला. विशेष म्हणजे, कारवर झाड कोसळताच मागून येत असलेल्या टोयोटा कार चालकाचा स्टेअरिंगवरून नियंत्रण सुटल्याने ती कारही रस्त्याच्या शेजारील दुसऱ्या झाडावर धडकली. ज्यामध्ये त्या कारमधील चालकासह तिघेजण गंभीर जखमी झाले. यावेळी प्रत्यक्षदर्शींनी या विचित्र अपघाताची माहिती डूग्गीपार पोलिसांना दिली, पोलिसांनी घटनास्थळ गाठून बचावकार्याला सुरुवात केली आहे. दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments