Wednesday, April 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedकोलकाता महिला डॉक्टर अत्याचार आणि हत्याकांडाचे पडसाद, निषेधार्थ कँडल मार्च

कोलकाता महिला डॉक्टर अत्याचार आणि हत्याकांडाचे पडसाद, निषेधार्थ कँडल मार्च

गोंदिया : कोलकाता येथील महिला डॉक्टरवरील अत्याचाराचे पडसाद राज्यभरासह उमटत आहेत. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील नवेगाव/बांध येथे आज कैंडल मार्च काढला सदर महिला डॉक्टरला न्याय मिळावा दोषींवर कठोर कार्रवाई करावी अशी मागणी कैंडल मार्च काढणाऱ्यांनी केली आहे. (Kolkata Protests) कोलकाता येथील सरकारी रुग्णालयात कार्यरत एका महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना नुकतीच घडली.
या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. दरम्यान या  घटनेच्या निषेधार्थ नवेगाव/बांध येथे छत्रपति शिवाजी महाराज चौक ते बालाजी मंदिर पर्यंत सर्व पक्षीय तसेच व्यापारी संघटना, ग्रामवासी आणि शालेय विद्यार्थी सोबत शांततेत कैंडल मार्च काढत मृतात्म्यास शांती वाहुन या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला.तर कोलकाता अत्याचार व हत्या प्रकरणाचा केंद्रीय यंत्रणेकडून निष्पक्ष आणि पारदर्शक तपास करावा, आरोपींना लवकरात लवकर अटक करून कठोर कार्रवाई करावी, अशी मागणी शिवसेना उबाठा पक्षाचे जिल्हा प्रमुख शैलेश जायस्वाल यांनी केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments