जिल्ह्यात 10 फेब्रुवारीपर्यंत मनाई आदेश लागू

0
323

गोंदिया : जिल्ह्यात 26 जानेवारी ते 10 फेब्रुवारी या कालावधीत विविध पक्ष व संघटनांकडून त्यांच्या प्रलंबीत मागण्यासंदर्भाने उपोषणे, धरणे, मोर्चे, रास्तो रोको, जेल भरो व संप आदी आंदोलने आयोजित केली जात आहेत. तसेच 30 जानेवारी रोजी जिल्ह्यात 10 मतदान केंद्रावर नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाची द्विवार्षिक निवडणूक घेण्यात येणार आहे. 2 फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे. दिनांक 3 ते 7 फेब्रुवारीपर्यंत धनेगाव (सालेकसा) येथे कचारगड यात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने 26 जानेवारीपासून ते 10 फेब्रुवारीपर्यंत सन 1951 च्या मुंबई पोलीस अधिनियमाची कलम 37 (1) (3) चे मनाई आदेश अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी स्मिता बेलपत्रे यांनी लागू केले आहे. सदर अधिसूचनेतील कोणत्याही शर्तीचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर फौजदारी नियमाअंतर्गत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.

रवि ठकरानी ( प्रधान संपादक)
93593 28219

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here