परराज्यीय मजुरांना घेऊन जाणारी ट्रॅव्हल्स पलटी

0
303

एक ठार, अनेक जखमी : विरुर-धानोरा मार्गावरील घटना
चंद्रपूर : छत्तीसगड येथून मजुरांना घेऊन हैद्राबादला जाणारी खासगी बस राजुरा तालुक्यातील विरुर ते धानोरा मार्गातील एक वळणावर उलटली. या अपघातात एक जण ठार, तर अनेक जण जखमी झालेत. ही घटना शनिवार, 28 जानेवारी रोजी पहाटे 3 वाजताच्या सुमारास घडली.
हैदराबाद येथे मजुरीसाठी छत्तीसगड, मध्यप्रदेशातून मोठ्या प्रमाणात मजूर जातात. शुक्रवारी दुपारच्या सुमारास 32 प्रवासी घेऊन धनी कंपनीची ट्रॅव्हल्स बस विरुर ते धानोरा, शिरपूर मार्गे निघाली. परंतु, शनिवारी पहाटेच्या सुमारास धानोरा गावाजवळली वळणावर ती बस पलटी झाली. यावेळी सर्व प्रवासी झोपेत असल्याने अपघात होताच धावपळ सुरू झाली. त्यात चेतन रात्रे या प्रवाशाचा मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच विरुर पोलिस ठाण्याचे ठाणेदार जयप्रकाश निर्मल तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी राजा पवार, राजुराचे ठाणेदार योगेश पारधी यांनी घटनास्थळी पोहचून 11 जखमींना तात्काळ राजुरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तर इतर किरकोळ जखमींवर विरुर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. माहिती कळताच जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनीसुद्धा तात्काळ राजुरा येथील रुग्णालयात जाऊन रुग्णांची विचारपूस केली. आरोग्य सेवक गाडीचा चालक खुशाल लकडे, स्वप्नील देवतळे, विश्वजित झाडे, रोहित जामदार यांनी पहाटेपासून रुग्ण हलवण्यासाठी परिश्रम घेतले.

रवि ठकरानी ( प्रधान संपादक)
93593 28219

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here