सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन

0
325

गोंदिया : जिल्ह्यामध्ये सर्व सामान्य जनतेसाठी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत आहे. सोमवार 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता लोकशाही दिनाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांचे अध्यक्षतेखाली, जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. लोकशाही दिनानिमित्ताने जिल्हाधिकारी यांचे कडून जनतेच्या तक्रारी, अडचणी व गाºहाणी ऐकून घेण्यात येतील आणि शासनाच्या विविध विभागांचे जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी यांना त्या संबंधी कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात येतील. जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनानिमित्य या कार्यक्रमात ज्या नागरीकांनी 15 दिवसापूर्वी अर्ज सादर केलेले आहेत, त्यांनीच लोकशाही दिनात उपस्थित राहून आपल्या तक्रारी, अडचणी व गाºहाणी सादर करावीत. याबाबत सर्व जनतेनी नोंद घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे यांनी केले आहे.

रवि ठकरानी ( प्रधान संपादक)
93593 28219

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here