Friday, November 21, 2025
Google search engine
HomeUncategorizedवैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांनी मुख्यालयात राहुन गुणवत्तापुर्ण आरोग्य सेवा लोकांना...

वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांनी मुख्यालयात राहुन गुणवत्तापुर्ण आरोग्य सेवा लोकांना द्या : डॉ.अभिजीत गोल्हार, जिल्हा आरोग्य अधिकारी

डिएचओ डॉ.गोल्हार यांची पीएचसी कुरहाडी व उपकेंद्र कटंगीला आकस्मिक भेट
गोंदिया.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार यांनी गोरेगाव  तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कुर्हाडी व आरोग्यवर्धिनी उपकेंद्र कटंगी येथे आकस्मिक भेट देवुन कामकाजाची पाहणी केली.त्यावेळी त्यांचे सोबत क्षयरोग विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.देव चांदेवार उपस्थित होते.
डॉ.अभिजीत गोल्हार यांनी मुख्यालयात राहुन आरोग्य सेवा पुरविणे,कार्यक्षेत्रातील गावांमध्ये कुठलीही तक्रार येणार नाही या बाबत सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी दक्षता घेणेआरोग्य संस्थेतील आतील व बाहेरील परिसराची स्वच्छता परिचरांनी नियमित ठेवणेनिरुपयोगी व भंगार साहित्यांचे निर्लेखन मार्गदर्शक सुचनेनुसार कार्यवाही करणे,बाह्यरुग्ण सेवा गुणवत्तापुर्ण देवुन दिवसाच्या दोन्ही वेळेत ओपीडी सुरळीत ठेवण्याच्या सुचना यावेळी दिल्या. भेटी दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्र कुर्हाडी येथील प्रसुतीगृह,प्रयोगशाळा,आंतररुग्ण वार्ड,औषधी साठा,लस साठवणुक केंद्र ई.ची पाहणी करुन लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्याच्या द्रुष्टीकोनातुन सुधारणा करण्याच्या सुचना वैद्यकिय अधिकारि यांना देण्यात आल्या.त्यात प्रामुख्याने प्राथमिक आरोग्य केंद्रातील आतील व बाहेरील परिसराची स्वच्छता नियमितपणे करणे,प्रसूतीगृहात भेट देऊन विविध ट्रे ची पाहणी केली.साथरोग उद्भवणार नाही ह्या दृष्टिने प्रतिबंधात्मक उपायोजना राबविणे,आकस्मिक सेवा सर्पदंशकुत्रा दंश,विंचू दंश बाबत रजिस्टर ची पाहणी केली.एकंदरीत प्रसूती वाढविणे,विविध पोर्टल एन्ट्री नियमित व वेळेत करणे,संशयित कर्करोग यादी बनविणे,एनसीडी तपासणी याबाबत सूचना दिल्यात,बाह्यरुग्ण सेवा (ओपीडी) दरम्यानच्या वेळेत रुग्णांना वेळेत चांगल्या सोयी देण्यात याव्यात,क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी नियमित गावनिहाय भेटीचे नियोजन करणे,पर्यवेक्षांनी उपकेंद्रांना भेटी देवुन सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचा आढावा घेण्यात यावा,हलचल रजिस्टरवर नोंदी करुनच मुख्यालय सोडावे.सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे करण्यात यावी.कर्मचारी यांनी कर्तव्यस्थानी ओळखपत्र व ड्रेस कोड नियमांचे काटेकोरपणे पालन करावे,जैविक घन कचरा व्यवस्थापन योग्य करणे,जनआरोग्य समीतीच्या सभा नियमीत घेणे,कुपोषित अंगणवाडीतील बालकांचे तपासणी करुन कुपोषित बालकांना श्रेणीनुसार वर्गीकरण करुन आवश्यक असल्यास एन.आर.सी.केंद्रावर भर्ती करण्याच्या सुचना दिल्या, गरोदर मातेला प्रसुतीपुर्व व प्रसुतीपस्चात नियमित सेवा देणे,आश्रमशाळेतील मुलांची आरडीके किट ने मलेरिया बाबत तपासणी करणे,अंगणवाडीतील बालकांची नियमित तपासणी व आरोग्य विषयक जनजाग्रुती साहित्य लोकांना दिसेल अशा ठिकाणी प्रदर्शित करणे बाबत विविध सुचना दिल्यात. भेटी दरम्यान त्यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.किर्ती चुलपार यांचे सह प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहायिका,स्टाफ नर्स,आरोग्य सेविका,परिचर उपस्थित होते.तसेच उपकेंद्र कटंगी येथे समुदाय आरोग्य अधिकारी,आरोग्य सेविका,आरोग्य सेवक उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments