श्री शिव महापुराण कथेचा माजी आमदार राजेंद्र जैन यांनी घेतला लाभ व आशीर्वाद

0
237

गोंदिया : ग्राम बिरसी (गोंदिया) येथे संगीतमय श्री शिव महापुराण कथा ज्ञान यज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री शिव महापुराण कथा ज्ञान यज्ञाच्या दुसऱ्या दिवशी माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांनी उपस्थित राहून श्री शिव महापुराण कथेचा लाभ घेतला व कथा वाचक श्री ह.भ.प.सचिन शास्त्रीजी महाराज यांचे आशीर्वाद घेतले.
या प्रसंगी माजी आमदार श्री.राजेंद्र जैन म्हणाले, श्रीमद शिव महापुराण कथा श्रवण केल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात आणि मानवी जीवनात परिवर्तन होतो. भोले बाबा श्री महादेव च्या चरणी सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धि येवो अशी प्रार्थना केली. यावेळी राजेंद्र जैन, बहादुरसिंग यादव, लोकचंद मुंडेले, सुनील पटले, शैलेश वासनिक, संतोष सोनवाने, उमेश पंडेले, नत्थूजी शेंडे, महेश सहारे, सेवकसिंग नायकाने, कबीरसिंग बैस, भोजराज कोरे सहित भाविक भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here