प्रलंबित प्रकरणे त्वरित निकाली काढा

0
225

गोंदिया : प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या मागण्यावर जिल्हा परिषद गोंदिया प्रशासनाकडून कोणतीच कार्यवाही होत नसल्याने जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष व जिल्हा अध्यक्ष पी.जी. शहारे यांचे नेतृवात दिनांक 9 मे 2023 रोजी मा. पंकज रहांगडाले अध्यक्ष जिल्हा परिषद गोंदिया यांचेशी भेट घेऊन व चर्चा करून प्रलंबित मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
ज्या कर्मचाऱ्यांची सेवा दहा वर्ष पूर्ण झाली त्यांचीच प्रशासकीय बदली करावी, दहा वर्षाच्या आतील सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांची प्रशासकीय बदली करण्यात येऊ नये, अंतर्गत विभाग बदलीची कार्यवाही करण्यात यावी, तक्रार निवारण समितीची सभा घेण्यात यावी , बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्यात यावे, नियमित पदोन्नती / कालबध्द पदोन्नतीची प्रकरणे निकाली काढण्यात यावी, या आणि इतर मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. मा. पंकज रहांगडाले, अध्यक्ष जिल्हा परिषद गोंदिया यांनी कर्मचारी महासंघाच्या मागण्यांबाबत त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) नरेश भांडारकर यांना दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here