गोंदिया : विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, दुर्गावाहिणीतर्फे मागील 20 वर्षापासून हिंदू नववर्ष गुढीपाडव्याचा सण उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यंदा विविध कार्यक्रमाचे आयोजन 21 व 22 मार्च रोजी करण्यात आले असून नागरिकांना घरोघरी भगवे झेंडे व दिव्यांची आरास करुन गुढीपाडवा साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गुढीपाडव्याला चैत्र नवरात्रीनिमितत 21 मार्च रोजी दुपारी 3 वाजता सिव्हिल लाईन हनुमान मंदिरातून श्रीराम मिरवणूक निघणार आहे. ही मिरवणूक शहरातील विविध मार्गाने भ्रमण करीत नेहरु चौकातील रामधाम येथे श्रीराम मूर्तीची प्रतिष्ठापीत करण्यात येईल. तसेच 22 ते 30 मार्च या कालावधीत रामधान येथे सकाळ-संध्याकाळ आरती, सत्संग, भजन, सुंदरकांडाचे आदी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून 30 मार्च रोजी रामनवमीचा उत्सव साजरा केला जाईल. गुढीपाडवा ते रामनवमीदरम्यान नागरिकांनी आपल्या घरांवर भगवे झेंडे लावावे व सायंकाळी दिव्यांची आरास करण्याचे तसेच श्रीराम मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, मातृशक्ती दुर्गावाहिणीने केले आहे.
आजपासून गुढीपाडवा ते रामनवमीदरम्यान विविध कार्यक्रम
RELATED ARTICLES