शहरातील एकमेव शहिद स्मारक
गोंदिया : स्थानिक छोटा गोंदिया येथील गोवर्धन चौकात प्रस्तावित जागेवर आदिवासी गोवारी शहिद स्मारकाच्या बांधकामाला सुरूवात करण्यात आली आहे. ‘शहिद ११४ आदिवासी गोवारी स्मारक समिती’च्या पुढाकाराने निर्माण कार्य सुरू आहे. शहरात प्रथमच शहिद झालेल्या ११४ आदिवासी गोवारी समाज बांधवांच्या स्मृतित स्मारक बांधकाम होत आहे. त्यामुळे हे गोवारी शहिद स्मारक शहरातील एकमेव स्मारक ठरले आहे.
आदिवासी गोवारी समाज संघटन महाराष्ट्र शाखा गोंदिया व्दारा संचालित ‘शहिद ११४ आदिवासी गोवारी स्मारक समिती’च्या वतीने गोवर्धन चौक, छोटा गोंदिया येथे शहिद स्मारकाचे बांधकाम करण्यात येत आहे. सदर शहिद स्मारक तयार करण्यात यावे, यासाठी समाज बांधव कित्येक वर्षांपासून प्रयत्न करीत होते. अखेर प्रयत्नांना यश मिळाले असून शहिद स्मारक बांधकामाला १७ एप्रिलपासून सुरूवात करण्यात आली आहे. यासाठी आदिवासी गोवारी समाज संघटनेचे अध्यक्ष सुशिल राऊत, उपाध्यक्ष गोंविद वाघाडे, सचिव शारदाताई राऊत, वसंत नेवारे, नानु चचाणे, मारूती नेवारे आदिंनी परिश्रम घेतले. शहरात प्रथमच शहिद झालेल्या ११४ आदिवासी गोवारी समाज बांधवांच्या स्मृतित स्मारक बांधकाम होत आहे, हे विशेष.
आदिवासी गोवारी शहिद स्मारकाचे निर्माण कार्य सुरू
RELATED ARTICLES