जुन्या पेन्शन साठी सरकारी, जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे धरणे/निदर्शने आंदोलन

0
197

गोंदिया : केंद्र सरकारने पी.एफ.आर.डी.ए. कायदा रद्द करावा, राज्य शासनाने जुनी पेंन्शन योजन पुर्वलक्षी प्रभावाने लागु करावी यासह अन्य वीस मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 9 जुलै रोजी सरकारी-निम सरकारी, जिल्हा परिषद, शिक्षक-शिक्षकेत्तर, नगरपालिका-नगरपरिषदा कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे मध्यवर्ती संघटनेचे निमंत्रक लिलाधर पाथोडे, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष व जिल्हा अध्यक्ष पी.जी.शहारे यांचे नेतृत्वात भव्य धरणे/निदर्शने आंदोलन करण्यात आले.
महारास्ट्र शासनाचे आमच्या प्रलंबित मागण्यांबाबत उदासिन धोरण दिसुन येत आहे. नवीन सरकार स्थापन झाल्यावर सहा महिण्याचा कालावधी लोटुन गेला मधल्या कालावधीत मा. मुख्यमंत्री पातळीवर चर्चा करुन ठोस निर्णय घेण्यात यावे यासाठी राज्य संघटनेमार्फत सातत्याने पत्रव्यवहार करण्यात आला. परंतु संघटनात्मक प्रयत्नांना वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. प्रलंबित मागण्याबाबत कर्मचारी वर्गात असंतोषाची भावना निर्माण झालेली आहे. शासनाचे मात्र या संदर्भात उदासिन धोरण दिसून येत आहे.
देशातील प्रधान 11 कामगार संघटनांच्या वतीने देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. सदर संपास समन्वय समितीचा पाठिंबा दर्शविण्यात आला आहे. मार्च 2023 मध्ये झालेल्या बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या आस्वासनाची पुर्तता अद्यापपर्यन्त शासन स्तरावरुन झालेली नाही त्यामुळे कर्मचारी वर्गात संतापाची लाट उसळली आहे. तसेच शासनाने दिनांक 6 सप्टेंबर 2023 रोजी शासन निर्णय काढून राज्यातील सर्व विभागातील वर्ग 1 ते 4 पर्यन्त कर्मचारी कंत्राटी कामगार नऊ कंपनीकडून भरण्याचे आदेश काढले आहे. त्यामुळे यापुढे भविष्यात सरकारी कर्मचारी राहणार नसून सर्व कंत्राटी कामगार असतील अशा शासनाच्या धोरणामुळे फारच भयानक परिस्थिती निर्माण होणार आहे त्यामुळे प्रलंबित 20 मागण्या बाबत धरणे/निदर्शने करण्यात आली असून मा.जिल्हाधिकारी व मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मार्फत मा. मुख्यमंत्री यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

निदर्शनाचे वेळी मध्यवर्ती संघटनेचे निमंत्रक लिलाधर पाथोडे, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष व जिल्हा अध्यक्ष पी.जी.शहारे यांचे समवेत कमलेश बिसेन, संतोष तोमर, भगीरथ नेवारे, चंद्रशेखर वेद्य, राकेश डोंगरे, रमेश नागपल्लीवार, तु.बा.झंजाड, विस्वनाथ कापगते, नंदकिशोर गुरुभेले, संतोष तोमर, संतोष तुरकर, सुभाष खत्री, भगीरथ नेवारे, नंदलाल कावळे, सौरभ अग्रवाल, गुणवंत ठाकुर, प्रा.दर्शना बोरकर, सु.च.कुंभरे, डब्लु.आर. भांडारकर, डी.एम.कुंभारे, डी.आर.कटरे, किशोर डोंगरवार, संदीप तिडके,ममता येडे, संदीप मेश्राम, राजेश मेनन, राज कडव, विदेश साखरे, गौतम बंते , उमेश रहांगडाले, राजेंद्र बोपचे , शोभलाल ठाकूर सुरेंद्र मेंढे, यासह जिल्हयातील विविध विभागातील मोठया संख्येने सरकारी-निम सरकारी, जिल्हा परिषद, शिक्षक-शिक्षकेत्तर, नगरपालिका-नगरपरिषदा कर्मचारी सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here