गोंदिया : गोंदिया शिक्षण संस्था द्वारा संचालित नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना चा स्वंयसेवक निखिल बन्सोड यास सन २०२२-२३ चा विद्यापीठ स्तरीय उत्कृष्ठ स्वंयसेवक पुरस्काराने नुकतेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर च्या दीक्षांत सभागृहात सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर च्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे वतीने नुकतेच रासेयो स्थापना दिनाचे औचित्य साधून उत्कृष्ठ स्वंयसेवक पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते त्यात गोंदिया जिल्ह्यातून निखिल बन्सोड यास विद्यापीठांचे कुलगुरू डॉ.शुभाष चौधरी यांचे हस्ते विद्यापीठ स्तरीय उत्कृष्ठ स्वंयसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी प्र-कुलगुरु डॉ.संजय दुधे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक सोपानदेव पिसे, गोंदिया चे माजी जिल्हासमन्वयक व विद्यापीठ बी.ओ.एस सदस्य डॉ.बबन मेश्राम मंचावर उपस्थित होते.
निखिल यांने रासेयो च्या माध्यमातून राज्यस्तरीय, विद्यापीठ स्तरीय , महाविद्यालय स्तरावरील शिबिरात सहभाग होता.तसेच निखिल विदर्भात आपल्या व्याख्यानाच्या माध्यमातून चर्चेत असलेले देवरी तालुक्यातील मुंडीपार येथील झाडीपट्टीरत्न म्हणून ओळख आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबरोबरच समाजसेवेची वृत्ती जडावी व विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्वाची जाणिव निर्माण करुन त्यांना सामाजिक कार्याचा सराव करण्यास वाव देणे हे या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे उद्दिष्ट आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे दरवर्षी उत्कृष्ठ स्वंयसेवक यांना सन्मानित करण्यात येते.
निखिल शैक्षणिक कार्यासोबतच सामाजिक प्रबोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहे. रक्तदान शिबिर, अंधश्रद्धा निर्मूलन, संत महापुरुषांचे विचार समाजात पोहचवण्याचे काम करत आहे. माणूस म्हणून जगताना या विषयावर त्यांचे ५० च्या वर व्याख्याने झाली आहेत निखिल हे आदर्श समाज घडविण्यासाठी झटत आहेत. त्यांच्या कामांची दखल घेत आतापर्यंत अनेक राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. निखिल बन्सोड यांनी आतापर्यंत रासेयोच्या ६ शिबिरात मोलाची भुमिका बजावली.
या यशाचे गोंदिया शिक्षण संस्था चे अध्यक्ष वर्षाताई पटेल , सचिव राजेंद्रजी जैन,युवासंचालक निखिल जैन , न.मा.द. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ .शारदा महाजन,रातुम नागपूर विद्यापीठाचे संचालक डॉ.सोपानदेव पिसे, कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ बबन मेश्राम,प्रकाश शुक्ला,बाबुराव मडावी विद्यालय देवरी, मनोहर भाई पटेल कला व कनिष्ठ महाविद्यालय देवरी चे प्राचार्य व शिक्षक, आईवडील यांना
दिले आहे.
रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.रविकुमार रहांगडाले, डॉ.अश्वीनी दलाल सह महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग , शिक्षकेत्तर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजना चे जिल्हातील रासेयो कार्यक्रम अधिकारी व स्वंयसेवक, मित्र परिवार, हितचिंतक यांनी अभिनंदन केले.
एन.एम.डी. महाविद्यालयाचा निखिल यांचा रासेयो उत्कृष्ठ स्वंयसेवक विद्यापीठ पुरस्काराने गौरव
RELATED ARTICLES