गोंदिया : जिल्ह्यातील सडक अर्जुनी वनपरिक्षेत्रातील वन कर्मचारी तक्रार दराकडून 5000 रुपयाची लाच घेताना गोंदिया एसीबीच्या टीमने जाळ्यात अडकविले आहे . ही कारवाई शुक्रवार 20 सप्टेंबर रोजी करण्यात आली आहे. आरोपीचे नाव वनरक्षक तुलसीदास प्रभुदास चव्हाण व वनमजूर देवानंद कोजबे असे सांगण्यात आले आहे सदर आरोपींच्या विरोधात डुग्गीपार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे की यातील तक्रारदार यांची शेती दल्ली शिवारात वन जमीन लगत असून दोन आठवड्यापुर्वी तक्रारदार यांनी शेतालगतच्या वन जमिनीतील झाडे झुडपे तोडून शेती करण्याकरीता जमीन साफसूफ केली होती. दिनांक 13 /09/ 24 रोजी वनरक्षक चव्हाण याने तक्रारदार यांना फोन करून सडक अर्जुनी येथे बोलावून त्यांना शासकीय वन जमिनीवरील झाडे झुडपे तोडून अतिक्रमण केल्याबाबत नोटीस दिली व त्यानंतर आरोपी क्रमांक एक याने शासकीय वन जमिनीवरील झाडे झुडपे तोडल्याबाबत कारवाई न करण्याकरता तक्रारदाराकडे वीस हजार रुपये रकमेची लाच मागितली. त्याबाबत तक्रारदाराने ला. प्र. वि. गोंदिया येथे तक्रार दिली होती.
लाच मागणी पडताळणी दरम्यान आरोपी क्रमांक वनरक्षक याने पंचासमक्ष वीस हजार रुपये लाच रकमेची मागणी करून तडजोडीअंती दहा हजार रुपये लाच रक्कमेची मागणी करून लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली. सापळा कारवाईदरम्यान आरोपी वनरक्षक याच्या सांगण्यावरून आरोपी वनमजूर याने लाच रकमेतील पहिला लाचेचा पहिला हप्ता रुपये 5000 तक्रारदाराकडून स्वीकारला. दोन्ही आरोपींना लाच रकमेसह ताब्यात घेण्यात आले असुन पोलीस स्टेशन डुग्गीपार जि. गोंदिया येथे गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही सुरू आहे.