गोंदिया : 18 सप्टेंबर 2023 ला बाबासाहेब आंबेडकर चौक, गोंदिया येथे ओबीसी जनाक्रोश महाआंदोलनात जीडीसीसी बँकेचे संचालक रेखलाल भाऊ टेंभरे उपस्थित झाले. व ओबीसी समाजाच्या मागण्यांना व ओबीसी समाजाच्या जनाक्रोश महाआंदोलनाला त्यांनी आपला समर्थन दिला. व शासनाने ओबीसी समाजावर अन्यायकारक धोरणे केली तर *करु या मरु* च्या अवस्थेत येण्याचे संकेत दिले. व *जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी हिस्सेदारी* हा नारा दिला. ओबीसी समाजाची जनगणना करावी, ओबीसीच्या आरक्षणात होणारी घुसखोरी थांबवावी, ओबीसी विद्यार्थी वस्तीगृह तयार करावे, पोलीस पाटील भरतीतील ओबीसी वरील अन्यायाच्या विरोध, ओबीसी समाजाला 52% आरक्षण मिळावे, सरकारने मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये, ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये, केंद्र सरकारने 50 टक्क्यांच्या वर आरक्षणाची मर्यादा वाढवावी असे अनेक मागण्या या जनाक्रोश महाआंदोलनाद्वारे शासनाकडे करण्यात आल्या.
ओबीसी समाजाच्या ओबीसी जनआक्रोश महाआंदोलनाला टेंभरे उपस्थित
RELATED ARTICLES