Wednesday, September 18, 2024
Google search engine
HomeUncategorized'कचरामुक्त भारत'साठी सरसावले शेकडो हात

‘कचरामुक्त भारत’साठी सरसावले शेकडो हात

स्वच्छता ही सेवा : जिल्हा परिषद ते ग्रामपंचायत पर्यंत श्रमदानातून स्वच्छता मोहीम
गोंदिया : संपूर्ण देशात ‘स्वच्छता ही सेवा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत आज (ता.17) जिल्हा परिषद प्रशासकीय इमारत परिसरासह जिल्हयातील आठ पंचायत समिती आणि 547 ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छतेसाठी महाश्रमदान उपक्रम राबविण्यात आले. यात जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांतर्गत 5864 पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व स्वयंसेवकांनी कचरामुक्त भारत करण्यासाठी श्रमदान करून स्वच्छतेचा नवा आदर्श निर्माण केला आहे.*
जिल्हा परिषद प्रशासकीय इमारत परिसरात मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अनिल पाटील यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांना स्वच्छतेची शपथ दिली. पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. नरेश भांडारकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. जनार्दन खोटरे, जिल्हा आरोग्य अधिकारी श्री. डॉ. नितीन वानखेडे, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजय गणवीर, कार्यकारी अभियंता श्री. सत्यजीत राऊत, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश सुतार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (मग्रारोहयो) श्री. दिनेश हरीणखेडे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. निरंजन अग्रवाल, सर्व शिक्षा अभियानाचे कार्यकारी अभियंता श्री. जीवनेश मिश्रा, गोंदिया पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. डी. एस. लोहबरे यावेळी उपस्थित होते. स्वच्छता ही सर्वांनाच प्रिय आहे. मात्र, स्वच्छतेसाठी श्रमदान करण्याचे अनेक व्यक्ती टाळतात. आपण केलेल्या घाणीमुळे इतरांना त्रास होेणार नाही. तथा सार्वजनिक ठिकाणात स्वच्छता राखण्याची भावना जोपासा आणि व कचरा विलगीकरणाच्या सवयीसह स्वच्छतेच्या या मोहीमेत प्रत्येक व्यक्तीने सहभागी व्हा, असे आवाहन यावेळी शपथ दिल्यानंतर मा. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी केले. स्वच्छता शपथ घेतल्यानंतर जिल्हा परिषदेतील 124 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परिसर स्वच्छता मोहीमेत भाग घेतला. श्रमदानातून जिल्हा परिषद परिसरातील केरकचरा काढून ओला-सुका कचऱ्याचे वर्गीकरण करण्यात आले. जिल्हा परिषदेसह जिल्हयातील आठही पंचायत समिती आणि 547 ग्रामपंचायतींमध्ये सुध्दा श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. जिल्हा परिषद ते ग्रामपंचायत पर्यंत सुमारे 5864 पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व स्वयंसेवकांनी स्वच्छतेच्या या उपक्रमांत सहभाग घेवून ‘कचरामुक्त भारत’ करण्यासाठी एक पाऊल उचलले आहे. महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून दरवर्षी 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान संपूर्ण देशभरात स्वच्छता ही सेवा हा उपक्रम राबविण्यात येतो. आपले गाव, आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर असावा, यासाठी स्वच्छतेच्या या जनआंदोलनात श्रमदानावर भर देण्यात आलेला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती, शिक्षण व संवाद तज्ञ श्री. अतुल गजभिये यांनी केले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नरेंश भांडारकर यांच्या मार्गदर्शनात आयोजनासाठी माहिती, शिक्षण व संवाद तज्ञ श्री. अतुल गजभिये, जिल्हा माध्यम व विस्तार अधिकारी श्री. प्रशांत खरात, वरिष्ठ सहायक श्री. संतोष तोमर, शिक्षण विभागाचे कनिष्ठ प्रशासन विभाग श्री. सौरभ अग्रवाल, माहिती, शिक्षण व संवाद तज्ञ श्री. राजेश उखळकर, स्वच्छता तज्ञ श्री. सूर्यकांत रहमतकर, शालेय स्वच्छता तज्ञ श्री. भागचंद रहांगडाले, श्री. रमेश उदयपुरे यांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments