Wednesday, May 22, 2024
Google search engine
HomeUncategorizedकचारगड यात्रेत गर्दीचे व्यवस्थापन सुनिश्चित करा

कचारगड यात्रेत गर्दीचे व्यवस्थापन सुनिश्चित करा

कर्नल विश्वास सुपनेकर यांचे सूचना
गोंदिया: कचारगड यात्रेला विविध राज्यातून भाविक येत असतात. त्यामुळे गर्दीचे व्यवस्थापन सुनिश्चित करण्यात यावे अशा सूचना सेवानिवृत्त कर्नल विश्वास सुपनेकर यांनी दिल्या. कचारगड-धनेगाव येथील सभागृहात आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. अर्जुर्नी/मोर उपविभागीय अधिकारी विजयकुमार सुर्यवंशी, जिल्हा नियोजन अधिकारी कावेरी नाखले, जिल्हा पुरवठा अधिकारी लिना फलके यावेळी मंचावर उपस्थित होते.
यात्रे दरम्यान अचानकपणे कुठलीही आपत्ती येऊ शकते. त्यामुळे अग्नीशमन दल, आरोग्य विभाग, औषध व अन्न पुरवठा, विद्युत विभाग, पाणी पुरवठा विभाग व पोलीस विभागानी सतर्क राहून काम करावे अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. चार भागात विभागनी करुन प्रत्येकाचे नोडल अधिकारी नेमून गदीर्चे व्यवस्थापन केले तर यात्रा सुलभरित्या पार पाडण्यास मदत होते. यात्रे दरम्यान सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याची गरज आहे. मुक्काम करणाºया भाविकांची योग्य ती व्यवस्था करण्यात यावी असे त्यांनी सांगितले. भाविकांना योग्य त्या सोई-सुविधा पुरविण्यात याव्यात. लाईटची व्यवस्था करणे अत्यंत आवश्यक असून त्याला बॅकअप (जनरेटर) असणे गरजेचे आहे. पोलीस विभागाने रिकवरी टीम ठेवण्यात यावी व त्याबाबत नियोजन करण्यात यावे. दुकानदारांची नाव नोंदणी करणे गरजेचे आहे. यात्रे दरम्यान नागरिकांना भोजनदान दिले जाते, त्यामुळे अन्नाचे निरीक्षण करणे आवश्यक आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने पुरेपूर औषधी साठा उपलब्ध करुन ठेवावा. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालय व्यवस्था तसेच अग्नीशमलन दलची व्यवस्था करण्यात यावी, असे त्यांनी सांगितले.
सालेकसा तालुका मुख्यालयापासून 6 कि.मी. अंतरावर हाजरा फॉल निसर्गरम्य पर्यटन स्थळ असून जवळच आदिवासी कुलदैवतेचे श्रध्दास्थान म्हणून कचारगड देवस्थान आहे. या ठिकाणी दरवर्षी फेब्रुवारी माघ पौणिमेनिमीत्त पाच दिवसाच्या यात्रेचे आयोजन व आदिवासी महासंमेलना निमीत्त सदर यात्रेस मोठ्या प्रमाणात झारखंड, बिहार, मध्यप्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र व इतर राज्यातून भाविक येत असतात. यावर्षी 3 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी पर्यंत कचारगड यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. असे यावेळी सांगण्यात आले. कार्यशाळेस तहसिलदार (अजुर्नी/मोर) विनोद मेश्राम, अपर तहसिलदार (गोंदिया) अनिल खडतकर, तहसिलदार (सालेकसा) डी.एम.मेश्राम, ठाणेदार जनार्दन हेगडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय बिसेन यांचेसह जिल्ह्यातील विविध विभागाचे प्रमुख अधिकारी तसेच कचारगड देवस्थान समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यशाळेचे सुत्रसंचालन करुन उपस्थितांचे आभार आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी मानले.

रवि ठकरानी ( प्रधान संपादक)
93593 28219

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments