Wednesday, February 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedगोंदियात ‘अरुणोदय’ सिकलसेल अॅनिमिया विशेष अभियानाचा शानदार शुभारंभ

गोंदियात ‘अरुणोदय’ सिकलसेल अॅनिमिया विशेष अभियानाचा शानदार शुभारंभ

गोंदिया : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने सिकलसेल आजाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी ‘अरुणोदय सिकलसेल अॅनिमिया विशेष अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाचा जिल्हास्तरीय उद्घाटन सोहळा आज के. टी. एस. जिल्हा सामान्य रुग्णालय, गोंदिया येथे उत्साहात पार पडला.
​कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजित गोल्हार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तृप्ती कटरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. डी. जायस्वाल उपस्थित होते. तसेच जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी श्री. विजय आखाडे, साथरोग अधिकारी डॉ. निरंजन अग्रवाल, डॉ. सुवर्णा हुबेकर, डॉ. सोनल मेश्राम, प्रशांत खरात (IEC विभाग), सिकलसेल समन्वयक स्वप्ना खंडाईत, प्रज्ञा कांबळे यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
​हे विशेष अभियान १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत सिकलसेलची तपासणी, निदान, मोफत उपचार आणि व्यापक जनजागृतीवर भर दिला जाणार आहे.
​डॉ. कुसुमाकर घोरपडे (अधिष्ठाता): “सिकलसेल हा पूर्णपणे बरा होणारा आजार नसला तरी, योग्य वेळी निदान आणि नियमित उपचार घेतल्यास रुग्ण सामान्य आयुष्य जगू शकतो. ‘अरुणोदय’ अभियानाच्या माध्यमातून आपण शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्यांची तपासणी करणे आवश्यक आहे.”
​डॉ. पुरुषोत्तम पटले (जिल्हा शल्य चिकित्सक): “या २२ दिवसांच्या मोहिमेत जास्तीत जास्त नागरिकांनी आपली तपासणी करून घ्यावी. रक्ताच्या नात्यात लग्न टाळणे आणि विवाहापूर्वी सिकलसेल कुंडली जुळवणे ही या आजाराला रोखण्याची गुरुकिल्ली आहे.” ​डॉ. अभिजित गोल्हार (जिल्हा आरोग्य अधिकारी): “आरोग्य विभागातर्फे ग्रामीण आणि दुर्गम भागात विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. जनजागृतीसाठी आय.ई.सी. (IEC) विभागाच्या मदतीने गावोगावी माहिती पोहोचवली जात आहे.”
​या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थित नागरिकांना सिकलसेल कार्डचे महत्त्व आणि शासन देत असलेल्या सोयीसुविधांची माहिती देण्यात आली. आरोग्य कर्मचाऱ्यांनी हे अभियान यशस्वी करण्यासाठी कटिबद्ध राहण्याची शपथ यावेळी घेतली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments