आमगाव ः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक, विदर्भ प्रांताचे माजी बौद्घिक प्रमुख, माजी प्राचार्य सदाशिव रंगनाथ अंजनकर यांचे आज, 24 डिसेंबर रोजी पहाटे 5.40 ला निधन झाले. मृत्यूसमयी ते 89 वर्षाचे होते. भाजपाचे भंडारा-गोंदिया संपर्कप्रमुख विरेंद्र अंजनकर यांचे ते वडील होते. भवभूति शिक्षण संस्थेचे संचालक, भवभूति महाविद्यालयाचे प्राचार्य अशा विविध पदावर ते राहिले. त्यांच्या पार्थिवावर जवळील साकरीटोला घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष तथा माजी आ. केशवराव मानकर यांच्या अध्यक्षतेत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी खासदार सुनील मेंढे, आ. डॉ. परिणय फुके, माजीमंत्री राजकुमार बडोले, भाजप विदर्भ संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, माजी आ. भेरसिंह नागपुरे, माजी आ. गोपालदास अग्रवाल, मा. आ. हेमंत पटले, माजी आ. संजय पुराम, आ. सहषराम कोरोटे, आ. विनोद अग्रवाल, सुरेशबाबू असाटी, माजी म्हाडा सभापती तारीक कुरेशी, माजी म्हाडा सभापती नरेश माहेश्वरी यांच्यासह मोठ्या संख्येने संघाचे पदाधिकारी, स्वयंसेवक, भाजप कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते. त्यांच्या पाठीमागे दोन मुले, दोन मुली व नातवंड असा बराच आप्त परिवार आहे.
गोंदिया: संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सदाशिव अंजनकर यांचे निधन, साकरीटोला घाटावर झाला अंत्यसंस्कार..
RELATED ARTICLES