Friday, April 12, 2024
Google search engine
HomeUncategorizedगोरेगावमध्ये महाविकास आघाडीचा घरकुल योजनेकरीता तहसिलवर मोर्चा

गोरेगावमध्ये महाविकास आघाडीचा घरकुल योजनेकरीता तहसिलवर मोर्चा

गोंदिया : गोरेगाव येथील नगरपंचायतीच्यावतीने सर्वसामान्य व दारिद्र्यरेषेखाली नागरिकांना देण्यात आलेल्या आवास योजनेतील घरकुलाची थकीत निधीसह नवीन घरकुल मंजूर करण्याच्या मागणीला घेऊन भारतीय कम्युनिस्ट पार्टी अतंर्गत राज्य लाल बावटा शेत मजदूर संघटनेच्यावतीने तहसिल कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्याला महाविकास आघाडीचे घटक पक्ष काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेसने आपला पाठिंबा देत सहभाग नोंदवला. मोर्च्यात शेत मजदूर युनियनचे राज्य उपाध्यक्ष हौसलाल रहांगडाले,चरणदास भावे,कल्पना डोंगरे,गुणंतराव नाईक,रायाबाई मारगाये,चैतराम दियेवार तर महाविकास आघाडीचे मलेश्याम येरोला,माजी उपसरपंच राहूल कटरे,राष्ट्रवादी काँग्रेसचे कमलेश बारेवार,मेघराज चौधरी,शिवसेनेचे अविराज बोंबार्डे आदीं सहभागी झाले होते.गोरेगाव नगर पंचायतचे मुख्याधिकारी है सतत गैरहजर राहत असल्याने त्यांचा निषेध यावेळी नोंदवण्यात आला.तसेच नायब तहसिलदार चांदेवार यांना मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले.यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल लाभार्थ्यांना थकीत निधी उपलब्ध करुन देण्यात यावे.डीपीआर 3 मंजूर करण्यात यावे.अतिक्रमणधारकांना पट्टे देण्यात यावे.शहरात स्वच्छतेची कामे करण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश होता.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments