Saturday, July 27, 2024
Google search engine
HomeUncategorizedजल जीवन मिशन अंतर्गत गावस्तरावरील कामे वेळेत पूर्ण करा अन्यथा पुन्हा निविदा...

जल जीवन मिशन अंतर्गत गावस्तरावरील कामे वेळेत पूर्ण करा अन्यथा पुन्हा निविदा करू :मुरुंगानंथम एम. 

गोंदिया : केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील कुटुंबांना स्वच्छ व शुद्ध पाण्यासाठी नळ कनेक्शन दिले जाणार आहे. त्यातून प्रत्येक व्यक्तीला दररोज ५५ लिटर पाणी मिळेल. यासाठी जिल्ह्यात एकूण 1238 योजनां मंजूर करण्यात आलेल्या असून यापैकी 142 योजनांची कामे अद्याप सुरु झालेली नाहीत. ज्या गावात अद्याप कामे सुरू झालेली नाहीत त्या सेवा पुरवठादार यांनी 7 दिवसात कामे सुरू करावी, अन्यथा त्या कामासाठी पून्हा निविदा करण्यात येईल, असे आदेश मा. मुख्य कार्यकारी अधिकारी मुरुंगानंथम एम. यांनी आढावा सभेत दिले.
पाणी पुरवठा विभागा अंतर्गत आयोजीत आढावा सभेत अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. या सभेत उप मु का अ सामान्य व ग्रामपंचात श्री खामकर, प्रकल्प संचालक जल जीवन मिशन श्री आनंदराव पिंगळे, कार्यकारी अभियंता श्री सुमीत बेलपत्रे, सहाय्यक उप वन संरक्षक वन विभाग, कार्यकारी अभियंता लपा/ वीज वितरण कंपनी, फॉरेस्ट व गट विकास अधिकारी सर्व, वरिष्ठ भुवज्ञानिक भुसविय, उपविभागीय अभियंता / शाखा अभियंता/ कनिष्ठ अभियंता, pmc कन्सल्टसी, थर्ड पार्टी एजेंसी यासह विभागाती अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जलजीवन मिशन अंतर्गत सध्या 1096 गावांमध्ये योजनेची कामे सुरु झालेली असुन या महत्वकांक्षी योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांच्या डोक्यावरील हंडा कायमचा खाली उतरणार असून त्यांची पाण्यासाठीची वणवण देखील थांबणार आहे.
याकरीता केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन योजनेमधून ‘हर घर जल नळ’योजनेअंतर्गत माहे फेब्रुवारी २०२४पर्यंत 224722 कुटुंबांना पिण्याच्या पाण्याचे मोफत नळ कनेक्शन दिलेले आहेत. उर्वरीत 81837 कुटुंबांना नळ देणे शिल्लक आहेत. याकरीता एकुण 1238 पाणी पुरवठा योजनांना मंजुरी मिळालेली असुन यापैकी 142 योजनांची कामांची प्रगती फारच संथ गतीने असल्याने पुन्हा निविदा करण्यात येईल् असे आदेश त्यांनी यावेळी दिले. तसेच सुरु झालेल्या येाजनांचे कामे ३१ मार्च 2024 पुर्वी पुर्ण करण्याच्या सुचनाही त्यानी यावेळी दिल्यात. याकरीता सर्व गट विकास अधिकारी आणि त्यांची यंत्रणा यांनी कामाची पाहणी करुन इतंभूत माहिती ७ दिवसांत सादर करण्याचे आदेश दिले. याकरीता जिल्हास्तरावर सनियत्रण समिती गठीत करण्यास सांगितले. ज्या कामांकरीता निधी मंजुर झालेला आहे त्यांच कामावर खर्च होत आहे याबाबत खात्री करणे. योजना पुर्ण झाल्यावर त्यांची तपासणी थंर्ड पार्टी एजन्सीकडून करावी, काम योग्य प्रकारे मंजुरीनुसार ालेले नसल्यास संबधीत सेवा पुरवठाधारकास बॅल्क लिस्टेट करण्यात येईल. योजना पुर्ण झाल्यानंतर ग्रामपंयतीस हस्तातरण करणे आवश्यक आहे. सर्वाना मुबलक पुरेस पाणी वैयक्तिक नळाव्दारे मिळत असल्याची खात्री केल्यानंतर सदर गांव हर घर जल घोषीत करावे अशा सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या. याबाबत योजनेतील कामांना गती प्राप्त झाली असून दर आठवड्याला योजनेच्या कामाचा आढावा घेतला जात आहे. यावेळी उपस्थित सेवा पु रवठादार यांचे तक्रारी एकुन त्यांवर मार्ग काढण्यात आला. पुढील महिन्यांत बहुतांश गावांमध्ये योजना कार्यान्वित कशी होईल, याचे ठोस नियोजन करण्यात आले आहे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments