Saturday, July 27, 2024
Google search engine
HomeUncategorizedजिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार निवारण केंद्र : लोकसभा निवडणूक

जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार निवारण केंद्र : लोकसभा निवडणूक

नागरिकांच्या तक्रारींचे होणार निवारण
गोंदिया : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नागरिकांना व मतदारांना निवडणूक व आचारसंहिता आदी बाबत माहिती मिळावी व तक्रारींचे निवारण व्हावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे जिल्हा तक्रार निवारण केंद्र स्थापन करण्यात आले आहे. हे तक्रार निवारण केंद्र चोविस तास कार्यरत राहणार असून नागरिकांच्या निवडणुकीसंदर्भात असलेल्या तक्रारीचे या केंद्रामार्फत निवारण करण्यात येणार आहे. टोल फ्री क्रमांक १९५०, ०७१८२-२३६१४८ व मोबाईल ८०८०४५३१५२ हे तक्रार निवारण केंद्राचे टोल फ्री क्रमांक आहेत. या क्रमांकावर संपर्क साधून नागरिक आपल्या तक्रारी नोंदवू शकतात. त्याचबरोबर सी-व्हिजिल या ॲपवर येणाऱ्या तक्रारींचे निवारणही या केंद्रामार्फत केल्या जाणार आहे.

देवरी येथे तक्रार निवारण केंद्र स्थापन
१२ गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात गोंदिया जिल्ह्यातील ६६-आमगाव विधानसभा क्षेत्र येत असून निवडणुकीसंदर्भात नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तहसील कार्यालय देवरी येथेही तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. ०७१९९-२९५२९६ हा या केंद्राचा दूरध्वनी क्रमांक आहे. आमगाव विधानसभा क्षेत्रातील मतदारांना निवडणूक विषयी व आचारसंहितेबाबत काही तक्रार असल्यास वरील क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी देवरी कविता गायकवाड यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments