गोंदिया : कोरोना काळातील निर्बंधानंतर यंदा सण, उत्सव जल्लोशात साजरे होत आहे. गुढीपाडव्यापासून सण, उत्सव थाटात साजरे करण्यास सुरवात झाली असून 29 मार्च रोजी रामनवमी उत्सवाची जिल्हावासीयांनी जय्यत तयारी केली आहे. गोंदिया शहरात विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने नेहरु चौकात मागील आठ दिवसापासून राम उत्सव सुरु असून काल, 29 रोजी भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी, राम जन्मोत्सवानंतर महाप्रसादाचे वाटप होणार आहेत.
रविवारी शहरासह जिल्ह्यातील विविध मंदिरात रामजन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमासह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. रामजन्मोत्सवानिमित्त शहर भगवे तोरण, ध्वजाने मागील दोन दिवसापासूनच सजविण्यात आले आहे. त्यामुळे शहर भगवामय झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यात राम मंदिरासह विविध धार्मिक स्थळांवर रामजन्मोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. दरम्यान आज, 30 मार्च रोजी दुपारी 2 ते रात्री 12 वाजतादरम्यान शोभायात्रा काढण्याची परवानगी देण्यात आली असून नियमांचे उल्लंघन करणार्या वाहन व यंत्रांवर कारवाईसंदर्भात मार्गदर्शक सूचना रामजन्मोत्सव मंडळांना दिली असून पोलिस प्रशासनाने सण शांततेत पार पडावा यासाठी खबरदारी घेतली आहे.
जिल्ह्यात रामनवमीची जय्यत तयारी
RELATED ARTICLES