Saturday, September 21, 2024
Google search engine
HomeUncategorizedटिप्परची दुचाकीला धडक, आजोबा-नात जागीच ठार

टिप्परची दुचाकीला धडक, आजोबा-नात जागीच ठार

भंडारा : भरधाव टिप्पर आणि दुचाकी अपघातात दुचाकीवरील आजोबा आणि नातीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना आज, शनिवारी दुपारच्या सुमारास नागपूर नाका येथे घडली. कवळू बडवाईक (७०), वाणी महेंद्र बडवाईक (५) दोघेही रा. नवीन पुनर्वसन पिंडकेपार (बेला) असे अपघातात ठार झालेल्या आजोबा आणि नातीचे नाव आहे.बडवाईक आयुध निर्माणीतून सेवानिवृत्त झाले होते. त्यांची नात वाणी ही भंडारा येथील गायत्री विद्या मंदिरात शिक्षण घेत होती. तिला दररोज सकाळी शाळेत घेऊन जाणे व सुटीनंतर तिला परत आणणे असा त्यांचा नित्यक्रम होता. दरम्यान, आज दुपारी शाळेला सुटी झाल्यानंतर ते वाणीला घेऊन गावाकडे येत असताना भरधाव टिप्परने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. याप्रकरणी भंडारा पोलिसांनी टिप्परचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments