गोंदिया : ओडीसाकडून भरतपूर (राजस्थान) कडे जात असलेल्या ट्रेलरचा क्लिनर महामार्गावरील धाब्यातून पिण्याच्या पाणी आणण्यासाठी जात असताना विरूद्ध दिशेने येत असलेल्या दुसऱ्या ट्रेलरच्या चालकाने आपले वाहन भरधाव वेगात चालवून त्यास धडक दिली. यात त्याचा मृत्यू झाला. ही घटना 26 मार्च रोजी सकाळी 8.30 वाजताच्या सुमारास रायपूर-नागपूर मार्गावर देवरी तालुक्यातील शिरपूर नाक्याजवळ घडली. जयसिंग मदन चौधरी (वय 25 रा. सनोद जि. अजमेर) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी फिर्यादी चेतन गोवर्धन चौधरी (वय 27 रा. पिपरोली जि. अजमेर) याच्या तक्रारीवरून देवरी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास महिला पोलिस हवालदार पंधरे करीत आहे.
ट्रेलर-ट्रेलरच्या धडकेत क्लिनरचा मृत्यू
RELATED ARTICLES