Tuesday, June 25, 2024
Google search engine
HomeUncategorizedडॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने मोठया उत्साहात साजरी

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने मोठया उत्साहात साजरी

गोंदिया : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, परमपुज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस भवन, रेलटोली कार्यालय, गोंदिया येथे मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. जेटवण बुध्द विहार श्रीनगर, तसेच नवीन प्रशासकीय इमारत समोरील परमपुज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माजी आमदार श्री राजेन्द्र जैन यांनी माल्यार्पण करून विनम्र अभिवादन केले.

यावेळी माजी आमदार श्री राजेंन्द्र जैन संबोधनात म्हणाले की, प्रत्येकांनी महामानव परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आत्मसात करुन समाजात बंधुत्व व समताधिष्ठीत समाजाची भावना निर्माण करावी. भारतरत्न परमपुज्य डॉ बाबा साहेबांच्या विचाराची जाणीव करुन घेणे हि काळाची गरज आहे असे विचार व्यक्त केले.

यावेळी सर्वश्री राजेंद्र जैन, नानू मुदलीयार, अशोक सहारे, रफिक खान, विशाल शेंडे, विनीत सहारे, राजू एन जैन, मनोहर वालदे, राजेश दवे, मयूर दरबार, हरगोविंद चौरसिया, जयंत कच्छवाह, करण टेकाम, विनायक शर्मा, बालू मोरघडे, दीपक कनोजे, हरबक्ष गुरनानी, टी एम पटले, लखन बहेलिया, सोनल मेश्राम, जीवराज नारनवरे, त्रिलोक तुरकर, संदीप पटले, मनोहर लाडे, महेंद्र श्रीवास्तव, वामन गेडाम, व अन्य आदि उपस्थित होते.
………………………………………..
आज परमपूज्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सहयोग संगठन द्वारा श्रीनगर गोंदिया येथे शीत पेयाचे उद्घाटन माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाला अजय टेंभूर्ने, प्रशांत जांभुलकर, नितीन बडोले, वेदांत साखरे, डॉ मनोज राऊत, राहुल टेंभेकर, राहुल बंसोड, मनोज नंदगाये, नागसेन साखरे, विजय खोबरागड़े, शैलेश टेंभेकर, राजू शहारे, श्रीकांत जनबंधु, सुनील बडोले, आनंद( बंटी)बडोले, महेंद्र टेंभेकर, राजेश रामटेके, उज्वल साखरे, शैलेंद्र (बाळू) बडोले, भीमराव नागभीरे, देवेंद्र जांभुलकर, सुधीर टेंभूर्ने यांनी सहायता प्रदान केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments