Saturday, July 27, 2024
Google search engine
HomeUncategorizedतिरोडा बसस्थानकावरून सोन्याचे दागिने, रोख रक्कम चोरणाऱ्या दोन महिलांना अटक

तिरोडा बसस्थानकावरून सोन्याचे दागिने, रोख रक्कम चोरणाऱ्या दोन महिलांना अटक

3,95,500 रुपये किंमतीचे 7. 6 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे व रोख रक्कम 15,000 रुपये असा शंभर टक्के संपुर्ण मुद्देमाल हस्तगत

गोंदिया : पोलीस स्टेशन तिरोडा येथे दि.28/03/2024 रोजी फिर्यादी नामे सिमा किशोर ठाकरे वय 40 वर्षे, व्यवसाय गृहीणी रा. खात रोड, तुलसी नगर केसलवाडा ता.जि.भंडारा हया बसने प्रवास करत असताना त्यांचेकडे सोबत असलेल्या हँन्डबॅग मधुन बस स्टॉप तिरोडा येथुन सोन्याचे दागिणे दोन अनोळखी महीलांनी चोरी केलेवरुन पोलीस स्टेशन तिरोडा येथे अपराध क्रमांक:- 227/2024 कलम 379, 34 भा.द.वि. प्रमाणे दोन अनोळखी महीला आरोपी यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधिक्षक श्री. निखिल पिंगळे, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. नित्यानंद झा, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. साहील झरकर, प्रभारी अधिकारी श्री. देविदास कठाळे, पोलीस स्टेशन तिरोडा यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास पोउपनि. चिरंजीव दलालवाड गुन्हे प्रकटीकरण पथक पोलीस स्टेशन तिरोडा यांच्याकडे असुन पोउपनि.चिरंजीव दलालवाड सोबत तिरोडा येथील गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी बस स्टँड तिरोडा, बस स्टॅन्ड तुमसर, बस स्टॅन्ड भंडारा, येथील सी.सी.टी.व्ही. फुटेज चेक करून गोंदिया येथील सायबर सेल यांचे मदतीने मोठ्या शिताफीने सदर गुन्ह्याचा तपास करुन गुन्ह्यातील आरोपीतांचा शोध घेऊन आंतर जिल्हा चोरी करणारे महीलांची टोळीचा शोध घेऊन सदर गुन्ह्यातील *महीला आरोपी नामे 1) सैौ.सोनु रितेश भिसे वय 30 वर्षे रा.सतरापुर/कन्हान ता.पारशिवनी जि.नागपुर ,
2) श्रीमती सिमा विजय नाडे वय 53 वर्षे रा.रामेश्वरी टोली, रिंग रोड, अजनी नाका नागपुर जि.नागपुर यांच्या ताब्यातुन फिर्यादीकडुन चोरी केलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा खालील प्रमाणे नमूद मुद्देमाल हस्तगत करुन जप्त करण्यात आले आहे.
आरोपी क्र. 1) सौ.सोनु रितेश भिसे वय 30 वर्षे रा.सतरापुर कन्हान ता.पारशिवनी जि.नागपुर हिच्या घरुन व ताब्यातुन खालील वर्णनाचे मुद्देमाल हस्तगत करण्यात आले.
1) 1,02,000/- रु. एक सोन्याची चैन ज्याचे वजन 15 ग्रॅम 030 मिली दिसत असलेले किंमत अंदाजे. 2) 32,000/- रु.एक सोन्याची अंगठी ज्याचे वजन 5 ग्रॅम 130 मिली दिसत असलेले किंमत अंदाजे 3) 16,000/- रु.एक सोन्याची कानातील टॉप्स ज्याचे वजन 5 ग्रॅम 130 मिली दिसत असलेले किंमत अंदाजे. 4) 20,000/- रु. एक सोन्याची कानवेल ज्याचे वजन 6 ग्रॅम 140 मिली दिसत असलेले किंमत अंदाजे. 5) 7,000/- रु. एक सोन्याची अंगठी ज्याचे वजन 0.890 मिली ग्रॅम दिसत असलेले किंमत अंदाजे. 6) 13,000/- र्.एक सोन्याचे कानातील रिंग ज्याचे वजन 2 ग्रॅम 190 मिली दिसत असलेले किंमत अंदाजे. 7) 13,000/- रु.एक सोन्याचे कानातील रिंग ज्याचे वजन 1 ग्रॅम 810 मिली दिसत असलेले किंमत अंदाजे. 8) 12,000/- रु.एक सोन्याचे लहान मंगळसुत्र ज्याचे वजन 2 ग्रॅम 250 मिली दिसत असलेले किंमत अंदाजे. 9) 9,000/- रु.पाचशे रुपयाचे 18 नोटा. किंमत असे एकुण 2,24,000/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले. आरोपी क्र.2) श्रीमती सिमा विजय नाडे वय 53 वर्षे रा. रामेश्वरी टोली, रिंग रोड, अजनी नाका नागपुर जि.नागपुर हिच्या ताब्यातुन यातील आरोपी क्रंमांक 01 हिच्या घरुन खालील वर्णनाचे मद्देमाल हस्तगत करण्यात आले. 1) 39,000/- रु.एक सोन्याचे चैन ज्याचे वजन 5 ग्रॅम 540 मिली दिसत असलेले किंमत अंदाजे. 2) 45,000/- रु. एक सोन्याचा नेकलेस ज्याचे वजन 12 ग्रॅम 900 मिली दिसत असलेले किंमत अंदाजे. 3) 23,000/- रु. एक सोन्याची अंगठी ज्याचे वजन 4 ग्रॅम 890 मिली दिसत असलेले किंमत अंदाजे. 4) 12,000/- रु.एक सोन्याची अंगठी ज्याचे वजन 1 ग्रॅम 280 मिली दिसत असलेले किंमत अंदाजे. 5) 5,000/- रु.एक सोन्याचे पेन्डॉल ज्याचे वजन 5 ग्रॅम 630 मिली दिसत असलेले किंमत अंदाजे. 6) 24,000/- रु. एक सोन्याची अंगठी ज्याचे वजन 2 ग्रॅम 560 मिली दिसत असलेले किंमत अंदाजे. 7) 10,000/- रु. एक सोन्याचे लॉकेट ज्याचे वजन 2 ग्रॅम 020 मिली दिसत असलेले किंमत अंदाजे. 8) 4,000/- रु. एक सोन्याचे डोरले ज्याचे वजन 1 ग्रॅम 010 मिली दिसत असलेले किंमत अंदाजे. 9) 9,500/- रु. एक सोन्याची मोती असलेली नथ ज्याचे वजन 1 ग्रॅम 680 मिली दिसत असलेले किंमत अंदाजे 10) 6,000/- रु. पाचशे रुपयाचे 12 नोटा एकुण किंमत असे एकुण 1,86,500/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले, वरीलप्रमाणे नमुद दोन्ही आरोपीतांकडुन सोन्याचे एकुण वजन 76 ग्रॅम 80 मिली व एकुण किंमत 3,95,500/- रुपये व रोख रक्कम 15,000/- रुपये असा एकुण किंमती 4,10,500/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले आहे.
सदर गुन्ह्यातील आरोपींना सतरापूर/कन्हाण, ता.पारशिवनी जिल्हा नागपूर येथून ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन तिरोडा येथे आणून दि.10/04/2024 रोजीचे 13.12 वाजता अटक करुन मा. न्यायालयात पेश करण्यात आले असुन मा. न्यायालयाने दोघानाही न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. सदरची कामगिरी मा. वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखा पोलीस स्टेशन तिरोडा येथील पोउपनि. चिंरजीव दलालवाड, सोबत सफौ. मनोहर अंबुले, पोहवा. दिपक खांडेकर, पोशि. सुर्यकांत खराबे, पोशि. निलेश ठाकरे, नंदा बडवाईक, मपोशि.सोनाली डहारे यांनी तसेच सायबर सेल, गोंदिया येथील पोहवा दीक्षित दमाहे, धनंजय शेंडे, संजय मारवाडे , प्रभाकर पालांदुरकर, रोशन येरने यांनी केलेली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments