गोंदिया : ग्रामपंचायत स्तरावर मागील १४ वर्षांपासून ग्रामीण भागातील नागरिकांना विविध डिजिटल सेवा उपलब्ध करून देणाऱ्या ग्रामपंचायत संगणक परिचालकांनी गेल्या दिड महिन्यापासून सुरु असलेले आंदोलन मागे घेत कामावर परतण्याचा निर्णय घेतला आहे.११ डिसेबंर २०२५ पासून कामाच मोबदला वेळेवर मिळत नसल्याच्या मागणीसह इतर विविध मागण्या घेऊन संगणक परिचालकांनी राज्यभर बेमुदत ‘काम बंद आंदोलन सुरु केले होते.अल्प ९ हजार ९०० रुपये मानधनावर काम करून सुद्धा सहा सहा महिने मानधन मिळत नाही.मोर्चा आंदोलन करुनही मागण्या पूर्ण न झाल्याने संगणक परिचालकांनी काम बंद आंदोलन सुरुच ठेवले होते.यामुळे विकास कामावर परिणाम होत असल्याने पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संघमित्रा कोल्हे यांनी 12 जानेवारी 2026 ला विस्तार अधिकारी,ग्रामपंचायत अधिकारी संघटना,सरपंच संघटना व संगणक परिचालक संघटनेसोबत संयुक्त बैठक घेऊन तालुक्यातील संगणक परिचालकांच्या तालुकास्तरीय समस्यांचे निराकरण केले.त्या बैठकित समस्यांचे निराकारण झाल्याने व वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करून तालुक्यातील संगणक परिचालकांनी 13 जानेवारीपासून कामाला सुरवात केली आहे.तालुकास्तरीय समस्यांचे समाधान झाल्याने हे आंदोलन मागे घेण्यात येत असल्याचे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष कमलेश अनवादे, उपाध्यक्ष वैशाली तिडके, सचिव कैलास केवट, ज्योत्स्ना बोरकर, उमेश मेश्राम, तोलीराम नेरकर, सुभाष जांभुळकर, प्रकाश पटले, नंदकिशोर पटले, रीना राऊत, शैलेश साखरवाडे, शैलेश नागपुरे आदींनी म्हटले आहे.
दिड महिन्यानंतर ग्रामपंचायत संगणक परिचालक कामावर परतले
RELATED ARTICLES






