गोंदिया : शहरात दुषीत पाण्याचा पुरवठा होत असल्याबाबत व भुयारी गटार योजनेतंर्गत टाकण्यात येणा-या पाईपलाईन नंतर रस्त्याची स्थिती अतिशय वाईट होत असुन काही ठिकाणी रस्ते धसत आहे तर अनेक ठिकाणी कामानंतर रस्त्याचे पुर्ननिर्माणाचे काम चांगल्या दर्जाचे होत नसल्याबाबत तक्रारी या कार्यालयास प्राप्त झालेल्या आहे व दिनांक 04/04/2023 रोजी दे. देशोन्नती या वृत्तपत्रात ‘सिव्हील लाईन भागात गढूळ पाणीपुरवठा मजिप्राची वाढली डोकेदुखी’ याबाबतची सुध्दा बातमी प्रकाशीत झालेली आहे. करिता उक्त प्रमाणे प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने तात्काळ आवश्यक ती कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास सादर करावा. यावेळी श्री ओम प्रकाश मेठी, श्री गजेंद्र फुंडे, श्री विजय अग्रवाल, श्री देवेश मिश्रा, श्री लोकेश कल्लू यादव, श्री महेंद्र देशमुख, श्रीमती धर्मिष्ठा सेंगर, श्रीमती शालिनी डोंगरे, श्री सचिन चौरसिया, श्री आशीष विदर्भ सम्राट, श्री राजेश कनोजिया, श्री हर्षल पवार, श्री प्रशांत वडेरा, श्री मुजीब बेग, श्री आदेश शर्मा आदी उपस्थित होते.
दुषित पाणीपुरवठा व रस्त्यांच्या वाईट अवस्था दूर करा
RELATED ARTICLES