राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विस्तारीत कार्यकारिणी बैठक संपन्न
गोंदिया : शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी खासदार श्री प्रफुल पटेलजी व खासदार सौ सुप्रियाताई सुळे यांची निवड झाल्याबद्दल गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. पक्ष पदाधिकरी व कार्यकर्त्यांकडून राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पक्ष कार्यालयासमोर आतिषबाजी व मिठाई वितरण करून आनंद साजरा करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस भवन, कार्यालय रेलटोली येथे गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विस्तारीत कार्यकारिणी बैठक माजी आमदार श्री राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष श्री गंगाधर परशुरामकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्ह्यातील प्रत्येक गावात बूथ कमेटी स्थापन करण्याची जबाबदारी सर्व सेल चे जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष व बूथ कमेटी अध्यक्ष यांनी घ्यावी. पक्षाचे ध्येय धोरण जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी बूथ कमेटी आवश्यक आहे. निवडणुकीचे संचालन हे बूथ कमिटीच्या माध्यमातून होत असते त्यामुळे नव्याने बूथ कमेटी स्थापन करून पक्ष संघटन मजबूत करावे असे प्रतिपादन माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांनी केले.
पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी बूथ कमेटी आवश्यक आहे. त्याकरिता गावागावात बूथ कमेटी स्थापन करावी सोबतच महिला व युवकांची बूथ कमेटी स्थापन करून पक्ष वाढीकरिता प्रयत्न करण्याची गरज आहे. तसेच एक तास राष्ट्रवादी साठी हा उपक्रम राबवावा असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष श्री गंगाधर परशुरामकर यांनी केले.
यावेळी जिल्ह्यातील तालुका निहाय्य बूथ प्रमुख म्हणून गोंदिया तालुका रवी पटले, सालेकसा तालुका मायकल मेश्राम, गोरेगाव तालुका सुरेंद्र रहांगडाले, सडक/ अर्जुनी तालुका चंदू बहेकार, अर्जुनी मोर तालुका किशोर तरोणे, देवरी तालुका कैलास टेम्भरे व चंचल जैन यांना माजी आमदार श्री राजेंद्र जैन व श्री गंगाधर परशुरामकर यांच्या हस्ते तालुका बूथ प्रमुख म्हणून नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी राजेंद्र जैन, गंगाधर परशुरामकर, विशाल शेंडे, यशवंत गणवीर, राजलक्ष्मी तुरकर, रफिक खान, डॉ माधुरी नासरे, सुशीला हलमारे, उषा मेश्राम, किरणताई कांबळे, कुंदा दोनोडे, सी के बिसेन, बाळकृष्ण पटले, प्रेमकुमार रहांगडाले, अविनाश काशीवार, केवळ बघेले, लोकपाल गहाणे, डॉ अजय उमाटे, मोहन पटले, अखिलेश सेठ, शंकरलाल टेभरें, राजेश जमरे, इंजि. डी. यू. रहांगडाले, रवी पटले, दाणेश साखरे, भुवन हलमारे, बाजीराव तरोणे, घनेश्वर तिरेले, खुशाल वैद्य, सुरेंद्र रहांगडाले, खालिद युसूफ खान, गंगाराम बावनकर, डॉ संदीप मेश्राम, चुन्नीलाल शहारे, पंकज शहारे, सुजितकुमार अग्रवाल, मायकल मेश्राम, अल्केश मिश्रा, उद्धव मेहंदळे, पन्नालाल बोपचे, जयेश उके, नागो सरकार, प्रतीक पारधी, दिलीप कापगते, नितीन टेभरें, करण टेकाम, पंकज चौधरी, चंद्रपाल पटले, सुनील कापसे, दिलीप डोंगरे, सैय्यद इकबाल, मुनिश्वर कापगते, राजेशकुमार तुरकर,कपिल बावनथडे, सतीश कोल्हे, सुरेश चुटे, टी. एम. पटले, संजय लाडे, मुनेश्वर कावळे, भोजराज चव्हाण, विजय रहांगडाले, शैलेश वासनिक, सुनील पटले, आरिफभाई पठाण, राजेशकुमार तायवाडे, प्रवीण बिजेवार, चेतना पराते, शर्मिला निमजे, मीरा गुप्ता, पुरण उके, नागरतन बन्सोड, वीरेंद्र इलपाटे, तुळशीदास कोडापे, प्रकाश बरय्या, अरमान जायस्वाल, दिलीप कापगते, लव माटे, कुणाल बावनथडे, कान्हा बघेले, रवी रहांगडाले, रौनक ठाकूर, नरेंद्र बेलगे, वामन गेडाम सहित पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.
नव्याने तात्काळ बूथ कमिट्या स्थापन करा : माजी आमदार राजेंद्र जैन
RELATED ARTICLES