Friday, July 19, 2024
Google search engine
HomeUncategorizedनिर्दयतेने बंधिस्त केलेल्या 26 जनावरांची सुटका

निर्दयतेने बंधिस्त केलेल्या 26 जनावरांची सुटका

17 लाख 60 हजार रुपयांचा मुददेमाल जप्त
गोंदिया : पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, यांचे निर्देश, सूचनाप्रमाणे आणि मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अवैध धंदयाविरुध्द धाड मोहीम राबविण्यात येत आहे. तसेच या अनुषंगाने पो. ठाणे सालेकसा पोलीसांची अवैध धंदयाविरुध्द विशेष धाड मोहिम सुरु आहे.
2 आगस्ट 2023 रोजी पोलीस निरीक्षक श्री. बाबासाहेब बोरसे, ठाणेदार सालेकसा यांना मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे सालेकसा पोलीसांनी गस्तीदरम्यान अवैध जनावरें वाहतूक संदर्भात कारवाई केली असता मौजा- पांढरवानी (बिजेपार) ते डोमाटोला जंगल परिसरातील ठाकुरटोला गावातील रस्त्यावर एक ट्रक (आयसर) क्र.एम.एच- 40 सी.एम. 4034 डोमाटोला कडुन पांढरवानी (बिजेपार) कडे जातांना दिसून आल्याने सदर ट्रकला थांबविन्याचा प्रयत्न केला असता सदर ट्रकचे ड्रायव्हरने ट्रक (आयसर) ठाकुरटोला गावातील रस्त्यावर थांबविला व तेथून जंगलात पळून गेला. पाठलाग केला असता मिळून आले नाही. सदर ट्रकचे मागील डाल्याची पाहणी केली असता ट्रक मध्ये डाल्यात लहान- मोठे गोवंश जातीचे एकूण 26 जनावरे दोरीने दाटी वाटीने बांधुन डांबून ठेवून सदर जनावरांना कोणत्याच प्रकारचे चा-या पाण्याची सोय न करता निर्दयतेने बांधुन ठेवलेले मिळुन आले. गोवंश जातीचे 26 जनावरे कि. अं. 2 लाख 60 हजार /- रु व ट्रक (आयसर) कि. अं. 15 लाख /-रु असा एकुण 17 लाख 60 हजार /- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आले. पो.ठाणे सालेकसा येथे अज्ञात इसमाविरुध्द कलम 11 (1) (ड) (इ), (फ) (ह) महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा, सहकलम 5 (अ) (2),9 महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1960 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्ह्यातील अज्ञात आरोपी चा शोध घेणे सुरु आहे. सदर गुन्हयाचा तपास म.पो.उप.नि. मयुरी नागदिवे हे करित आहेत. सदर गुन्हयात जप्त गोवंश जातीचे जनावरांना त्यांचे सुरक्षेच्या दृष्टीने लक्ष्मी गौशाला चॅरीटेबल ट्रस्ट चुटीया ता. जि. गोंदिया येथील गौशालेत दाखल करण्यात आले आहे. सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक श्री. निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक, श्री. अशोक बनकर, उप- विभागिय पोलीस अधिकारी, आमगांव यांचे मार्गदर्शनात ठाणेदार सालेकसा पो. निरीक्षक बाबासाहेब बोरसे, म.पो. उप.नि. मयुरी नागदिवे, पोशि.अजय इंगळे,विकास वेदक, पो.स्टे. सालेकसा यांनी सदरची कामगिरी बजावली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments