Tuesday, October 15, 2024
Google search engine
HomeUncategorizedपक्षात उत्साह व उमंग ठेवा : प्रफुल पटेल

पक्षात उत्साह व उमंग ठेवा : प्रफुल पटेल

गोंदिया : गोंदिया तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता बैठकीचे आयोजन एन.एम.डी.महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीत समन्वयाने कार्य करायचे असून पक्षात उत्साह व उमंग ठेवा नैराश्याने पक्ष पुढे जात नाही मी सदैव आपल्या पाठीशी उभा आहे हे पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना खा.श्री प्रफुल पटेल बोलत होते.

खा.श्री प्रफुल पटेल पुढे बोलतांना म्हणाले कि, संपूर्ण राजकीय जिवनात गोंदिया व भंडारा जिल्ह्याची जिम्मेदारी सांभाळतांना सामाजिक प्रश्न सोडविले आहेत. जनतेचा उत्साह व विश्वसनीयता पाहून लोक आत्मीयतेने जुळलेले आहेत हाच उत्साह व उमंग कायम राहू द्या. आगामी निवडणुकीत समन्वय करून महायुतीचा निर्णय घेतला जाईल. आपण सत्तेत आहो व पुढेही राहू विरोधकांनी पसरवलेल्या भ्रमात राहू नका, पक्षाने फुले, शाहू, आंबेडकर विचारधारा सोडलेली नाही. आम्ही माता – भगिनीच्या स्वावलंबन व आत्मनिर्भर बनाण्याकरिता लाडली बहीण योजना, शेतकऱ्यांसाठी मोफत वीज, शेतकऱ्यांना बोनस असे जन हिताचे कार्य केले आहे.

यावेळी सर्वश्री राजेंद्र जैन, प्रेमकुमार रहांगडाले, नरेश माहेश्वरी, विनोद हरिणखेडे, राजलक्ष्मी तुरकर, सुरेश हर्षे, जनकराज गुप्ता, हुकूम अग्रवाल, बाळकृष्ण पटले, कुंदनभाऊ कटारे, पूजा अखिलेश सेठ, केतन तुरकर, गणेश बरडे, रफिक खान, योगेंद्र भगत, रवीकुमार पटले, नानू मुदलियार, माधुरी नासरे, जगदीश बहेकार, अशोक सहारे, चुन्नीलाल बेंद्रे, नीरज उपवंशी, अश्विनी पटले, सरला चिखलोंडे, राजेश जमरे, शिवलाल जमरे, शंकरलाल टेम्भरे, अहमद भाई, आशा पाटील, कीर्ती पटले, बिरजूला भेलावे, खालिदभाई पठाण, सुनील भालेराव, सचिन शेंडे, भगत ठकरानी, घनश्याम मस्करे, प्रियाताई हरिणखेडे, किरण पारधी, मनोज डोंगरे, रमेश गौतम, सविता मुदलियार, कुंदा पंचबुद्धे, मालती कापसे, विनीत सहारे, विनोद पंधरे, विजय रगडे, पिंटू बनकर, अनुज जायस्वाल, नितिन टेम्भरे, करण टेकाम, निशिकांत बन्सोड, छोटू पंचबुद्धे, श्याम चौरे, सुनील पटले, शैलेश वासनिक, सहित गोंदिया ग्रामीण व शहरातील कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments