Thursday, July 10, 2025
Google search engine
HomeUncategorizedपरीक्षेतील गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत : प्रजित नायर

परीक्षेतील गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत : प्रजित नायर

कॉपीमुक्त अभियान आढावा
गोंदिया : फेब्रुवारी व मार्च २०२४ मध्ये १२ वी व १० वीची परीक्षा होणार आहे. सदर परीक्षेत कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. गैरप्रकार करणाऱ्या किंवा गैरप्रकारास मदत करणाऱ्या सर्व संबंधितास जबाबदार धरुन कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी दिला.
जिल्हा दक्षता समितीच्या बैठकीत अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. सदर बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी मुरुगानंथम एम., जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, शिक्षणाधिकारी (माध्य.) कादर शेख, शिक्षणाधिकारी (प्राथ.) डॉ.महेंद्र गजभिये उपस्थित होते.
२१ फेब्रुवारी २०२४ ते १९ मार्च २०२४ पासुन उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षा (इ.१२ वी) व १ मार्च २०२४ ते २६ मार्च २०२४ पासून माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ.१० वी.) परीक्षा सुरु होत असून गोंदिया जिल्हयात इयत्ता १२ वी करीता ७६ केंद्र व परीक्षार्थी संख्या १९९२४ असून इयत्ता १० वी ला ९८ केंद्र व परीक्षार्थी १८६०३ प्रविष्ट आहेत. फेब्रुवारी/मार्च २०२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.१२ वी) व माध्यमिक शालांत परीक्षा (इ.१० वी ) परीक्षेदरम्यान कॉपीमुक्त अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याबाबत जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखालील दक्षता समितीची सभा १३ फेब्रुवारी रोजी घेण्यात आली. या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी खालीलप्रमाणे सर्व संबंधितांना अवगत करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत.
सर्व संबंधित अधिकारी यांना कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात परीक्षा दयावी, यासाठी सर्व घटकांनी आवश्यक दक्षता घ्यावी. परीक्षा काळात जमावबंदी कलम १४४ लागू करणेबाबत यासंबंधी सर्व संबंधितांना अवगत करण्यात यावे. भारतीय दंड विधान १८६० च्या कलम १८८ नुसार दंडात्मक कारवाईस पात्र असेल याबाबतची जाणीव करुन देणारे परिपत्रक निवासी उपजिल्हाधिकारी यांनी जारी करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.
परीक्षा काळात परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार होणार नाही याकरीता भरारी पथकाची नियुक्ती करण्यात यावी. एकूण परीक्षा केंद्राचे किमान १५ टक्के भरारी पथक असणे आवश्यक असल्याने आपल्या व किमान २ सदस्य अधिनस्थ अधिकारी/कर्मचारी यांचे भरारी पथक असावे ज्यामध्ये एक पथक असावेत. सदर भरारी पथकात किमान १ महिला सदस्य असणे अनिवार्य राहील असे निर्देश देण्यात आले. तहसिलदार यांनी आपले अधिनस्थ अधिकारी/कर्मचारी यांचे बैठक पथक नियुक्त करुन सनियंत्रण करावे. जिल्हा परिषद स्तरावरुन सर्व खातेप्रमुख/गटविकास अधिकारी यांनाही मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सूचना दयाव्यात. सर्व परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त पुरेशा प्रमाणात पुरविणेबाबत पोलीस अधीक्षक यांचेशी चर्चा करण्यात आली. इयत्ता १२ वी व १० वी परीक्षा केंद्र व प्रविष्ट विद्यार्थी संख्या याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. परीक्षा काळात कलम १४४ चे पालन कठोरपणे व्हावे, संभाव्य संवेदनशिल केंद्राबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या. दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे असे त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments