Friday, June 14, 2024
Google search engine
HomeUncategorizedपालकांनी जागृत राहून बालकांना पोलिओचा डोस अवश्य पाजा : जिल्हाधिकारी

पालकांनी जागृत राहून बालकांना पोलिओचा डोस अवश्य पाजा : जिल्हाधिकारी

1 लाख 548 बालकांना पोलिओचा डोस
गोंदिया : भारत हा पोलिओमुक्त देश आहे. मात्र काही देशांमध्ये पोलिओ अजुनही आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. आरोग्याच्या दृष्टीकोनातून देशात 0 ते 5 वर्षातील बालकांना पोलिओ डोस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी जागृत राहून आपल्या बालकांना पोलिओचा डोस आवश्य पाजा, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी केले.
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 3 मार्च 2024 रोजी राज्यात राबविण्याबाबत सूचना प्राप्त झालेल्या आहेत. त्याबाबत जिल्ह्यात जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय टास्क फोर्स समितीची सभा घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.
सभेला जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा शल्यचिकित्सक , अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे, डॉ. साजिद खान, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. रोशन राऊत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) संजय गणवीर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. निरंजन अग्रवाल, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद चव्हाण यांचेसह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
या मोहिमेत 0 ते 5 वर्ष वयोगटातील 1 लाख 548 बालकांना पल्स पोलिओचा डोस देण्यात येणार आहे. जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम यांनी ही मोहीम प्रभावीपणे राबवून शंभर टक्के लाभार्थी मोहिमेत पूर्ण करण्याबाबत सूचना दिल्या. आरोग्य विभागाने केलेल्या नियोजनातून जिल्ह्यातील ग्रामीण भागात 82 हजार 320 बालकांना व शहरी भागात 18 हजार 228 बालकांना पोलिओ डोस देण्यात येणार आहे. प्रत्येक गाव व पाड्यावर पोहोचून 1443 पल्स पोलिओ बुथच्या व 84 ट्रांजिस्ट टीम तसेच 34 मोबाईल टीमच्या माध्यमातून 44 प्राथमिक आरोग्य केंद्र व 258 उपकेंद्र तसेच अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका व 282 पर्यवेक्षक यांच्या माध्यमातून नियोजन केले असल्याचे माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. रोशन राऊत यांनी सांगितले. पल्स पोलिओ लसीकरण दिनाच्या दिवशी डोस घेण्यात आलेला नसेल अशा वंचित बालकांना गृहभेटी दरम्यान पोलिओ डोस देण्याचा कार्यक्रम ग्रामीण भागात दिनांक 5 ते 7 मार्च (3 दिवस) व शहरी भागात दिनांक 5 ते 9 मार्च (5 दिवस) पर्यंत नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments