Tuesday, June 25, 2024
Google search engine
HomeUncategorizedपोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे सन 2023 सन्मानचिन्ह प्रदान

पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे सन 2023 सन्मानचिन्ह प्रदान

गोंदिया : गोंदिया जिल्हा पोलीस आस्थापनेवरील उत्तम कामगिरी करणारे आणि उल्लेखनीय/ प्रशंसनीय सेवेबद्दल पोलीस अधिकारी-अंमलदार यांना पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी 25 एप्रिल 2024 च्या आदेशान्वये सन-2023 सन्मानचिन्ह प्रदान केले आहे. महाराष्ट्र शासन, गृह विभाग यांचे शासन निर्णयाद्वारे महाराष्ट्र पोलीस विभागात विविध प्रकारच्या प्रवर्गामध्ये केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल आणि उल्लेखनिय / प्रशंसनीय सेवेबद्दल राष्ट्रपतींचे पोलीस पदक / पोलीस पदक व पोलीस शौर्यपदक प्राप्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांना बोधचिन्ह / सन्मानचिन्ह प्रदान करण्याकरीता दिलेल्या मंजूरीनूसार सन- 2023 या वर्षाकरीता “परिशिष्ट अ” मध्ये निर्देशित केलेल्या गोंदिया जिल्हा पोलीस आस्थापनेवरील खालील नमूद सन्मान चिन्ह प्राप्त पोलीस अधिकारी व अंमलदार – उपविभागीय पोलीस अधिकारी, तिरोडा साहिल झरकर, सपोनि सोमनाथ जयवंत कदम, पोउपनि रोशन वासुदेवरा खांडेकर, सपोउपनि जितेंद्र राजनारायण मिश्रा, उमेश रामकृष्ण मलखांबे, प्रेमदास बालाजी होळी, ज्योती मोहनदास मरकाम, विनोद रामचंद्र कुंभरे, पुनम जिवनलाल हरीणखेडे, शैलेश सोमाजी राऊत, उमेश भगवान मंडारे, कैलाश हिवलाल शहारे, विकास भुजंगराव माने, निकलेश रमेश वासनिक, धिरज राजेंद्रप्रसाद दुबे, लिलाधर मोरेश्वर चुटे, महेश सोमाजी वलथरे, राहुल चरणदास सावरकर यांना विविध नमूद प्रवर्गामध्ये पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र 2023 प्रदान करीत असल्याचे दिनांक 25 एप्रिल 2024 च्या आदेशान्वये मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी जाहीर केले आहे. पोलीस महासंचालकांचे सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आलेल्या सर्व पोलीस अधिकारी अंमलदार यांचे मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई श्रीमती. रश्मी शुक्ला, मॅडम यांनी तसेच गोंदिया जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री.नित्यानंद झा, यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिलेल्या आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments