Thursday, July 25, 2024
Google search engine
HomeUncategorizedफळबागांना आग; पाच लाखांचे नुकसान

फळबागांना आग; पाच लाखांचे नुकसान

मुंडीपार शिवारातील घटना : पोलिसांत तक्रार दाखल
गोंदिया : सौंदडजवळील मुंडीपार शिवारातील शेतात चंदनासह फळबागाच्या झाडांना अज्ञात व्यक्तींनी आग लावली. या घटनेत 130 झाडे व सिंचनासाठी लावण्यात आलेले पाइप पूर्णत: जळून खाक झाले. यात शेतकरी भावना भाऊराव यावलकर यांचे जवळपास पाच लाखांहून अधिकचे नुकसान झाले आहे.
मुंडीपार/सिंदीपार गावशिवारात गट क्रमांक 25/2, 25/3/ अ ची एकूण 0.90 हे.आर. जागा आहे. या जागेत भावना यावलकर यांनी लाल चंदन, पांढरा चंदन, आंबा, फणस, लिंबू, रामफळ, संत्री, चिक्कू यासह अन्य फळबागांची झाडे लावली. आग लागल्याची माहिती मिळताच शेतकरी कुटूंब आग विझविण्याच्या कामाला लागले. त्याचबरोबर गावातील नागरिकांनीसुद्धा आगीला आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. परंतु, आग आटोक्यात येण्यापूर्वीच जवळपास 130 झाडे जळून खाक झाली. यामध्ये लाल चंदन 47, पांढरा चंदन 27, आंबा 28, फणस 3, लिंबू 1, रामफळ 1, संत्री 19, चिक्कू 3 व अन्य काही झाडांचा समावेश आहे. त्याचबरोबर 1400 मीटर ड्रीपच्या पाइपलाइनसह इतर साहित्याची राखरांगोळी झाली. यात यावलकर यांचे 5 लाखांहून अधिकचे नुकसान झाले. या घटनेचा कृषी व महसूल विभागाकडून पंचनामा करण्यात आला आहे. पोलिस विभागाला आग लावणाऱ्या अज्ञात व्यक्तीविषयी तक्रार करूनही पोलिस विभागाकडून दखल घेण्यात आली नाही, असे संबंधित शेतकऱ्याने सांगितले.

शासनाने नुकसानभरपाई द्यावी
शासनाने नुकसान भरपाई द्यावी व पोलिस विभागाने अज्ञात आग लावणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments