गोंदिया : ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) च्या वतीने दि.17 ते 21 फेब्रवारी 2026 दरम्यान इंदिरा गांधी स्टेडियम गोंदिया येथे ‘पलाश मिनी सरस’ प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाला आमदार विनोद अग्रवाल यांनी शुक्रवारी भेट दिली.
यावेळी त्यांनी ग्रामीण भागातील महिलांनी आपल्या कला व कौशल्यातून तयार केलेल्या वस्तुंची प्रत्येक स्टॉलवर जाऊन पाहणी केली व वस्तुंच्या निर्मिती व पॅकेजिंगविषयी उपयुक्त सूचना दिल्या. यावेळी पंचायत समिती सभापती मुनेश रहांगडाले, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रमिला जाखलेकर, जिल्हा अभियान व्यवस्थापक नरेंद्र रहांगडाले व इतर पदाधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते.



