Saturday, July 13, 2024
Google search engine
HomeUncategorizedबापरे...! हे कार्यालय उघडते 12 वाजता

बापरे…! हे कार्यालय उघडते 12 वाजता

शेतकऱ्यांचा वाढला रोष , कार्यालयातच दिला धरना
गोंदिया : सालेकसा तालुका हा अति दुर्गम आदिवासी नक्षलग्रस्त भागात मोडत असुन अनेक शासकीय योजनेपासून येथील नागरिकांना वंचित रहावे लागते अशीच एक बाब तालुका कृषी कार्यालय सालेकसा येथे घडून आली.आज (10 एप्रिल) आठवड्याचा पहिला दिवस असुन हे कार्यालय दुपारी अकरा वाजून 45 मिनिटांनी उघडले असल्याने गावातील नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी याबाबत रोष व्यक्त केला. ज्या अर्थी 9.30 वाजता कार्यालय उघडायला हवे व सर्व शासकीय कर्मचारी कार्यालयात उपस्थित झाल्या पाहिजे परंतु सालेकसा येथील कृषी कार्यालयात वेगळे चित्र बघायला मिळाले तालुका कृषी कार्यालयातील कर्मचारी स्थानिक नागरिकांकडून व शेतकऱ्यांकडून या विरोधात उशिरा आलेल्या कर्मचाऱ्यांना अडवून वेळेवर का आले नाही याबाबत विचारले त्यावर कर्मचाऱ्याकडून हुज्जतगिरीचे उत्तर मिळाल्याने नागरिकांचा संताप वाढला त्यावर उपस्थितांपैकी राहुल हटवार यांनी कार्यालयातच बसून धरणे आंदोलन सुरू केले सर्व अनुपस्थित कर्मचाऱ्यांची एका दिवसाची वेतन कापून उशिरा आल्यासाठी कारणे दाखवा नोटीस जाहीर केल्याशिवाय व यापुढे उशिरा आल्यास कारवाईस सामोरे जावे लागणार अशा मागण्या साठी कार्यालयातच धरणे देत अधिकाऱ्याला जाब विचारले त्यावर तालुका कृषी अधिकारी कुंभारे यांनी राहुल हटवार यांना सर्व कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करत एका दिवसाचे वेतन कापणार असल्याचे आश्वासन दिले. तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर धरणे आंदोलन थांबवण्यात आले.
सर्व शासकीय कर्मचारी कार्यालयीन मुख्यालय राहावे यासाठी त्यांना निवासी भत्ता मिळतो परंतु कोणीही शासकीय कर्मचारी सालेकसा तसेच मुख्यालयात राहत नसल्याने व रेल्वेच्या वेळापत्रकानुसार शासकीय कार्यालयांचे वेळापत्रक सुरू असल्याने अधिकारी व कर्मचारी उशिरा कार्यालयात पोहोचतात असे दिसून आले आहे. कर्मचारी जर मुख्यालय राहणे सुरू करतील तर उशिरा येण्याची समस्या निर्माण होणार नाही असेही राहुल हटवार यांनी बोलले .यावेळी ओबीसी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष मनोज डोये, सुनील असाटी, अनिल शेंद्रे, मायकल मेश्राम, बाजीराव तरोने , गोल्डी भाटिया, रोहित बनोठे, अंकुश सुर्यवंशी व शेतकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments