गोदिया : दरवर्षी प्रमाणे यंदाही भगवान झुलेलाल जन्म उत्सव (चेट्रीचंड्र) निमित्त विश्व सिंधी सेवा संगम युथ विंगतर्पेष्ठ १९ मार्च रोजी आदर्श सिंधी शाळेच्या प्रांगणात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आला होता. या रक्तदान शिबिरात महिला, तरुण-तरुणींनी उत्साहाने सहभाग घेऊन रक्तदान केले.
कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या हस्ते भगवान झुलेलाल यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. सिंधी शाळेत विराजमान साई झुलेलाल यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याबरोबरच पोलिस अधीक्षक पिंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भगवान झुलेलाल यांची आरती करण्यात आली.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे जिल्हा वाहतूक प्रभारी जयेश भांडारकर, गोंदिया ग्रामीणचे पोलिस निरीक्षक सचिन मेहेत्रे, गोंदिया गुन्हे शाखेचे प्रभारी दिनेश लबडे, जिल्ह्यातील प्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ. विकास जैन, पूज्य सचखंड दरबार उपस्थित होते. या कार्यक्रमात बाबा अमरदास उदासी, सिंधी समाजाचे अध्यक्ष नारायण (नारी) चांदवानी, डॉ. गंगाधर डूलानी, युथ क्लबचे अध्यक्ष मनोहर आसवानी, राजकुमार नोतानी, महेश आहुजा, जयपाल नूनानी, अनिल गंबानी, पूज्य सिंधी मनिहारी पंचायतीचे श्रीचंद डोडानी, नरेश ककवानी, पीर शिवनाथ मडी अशोक कट्यारे, व्यापारी असोसिएशनचे दिलीप लधानी, किशोर नागदेव, मनीष होतचंदानी, स्वामी शांती प्रकाश आर्शमाचे रघु वेदवानी व त्यांची टीम, सिव्हिल लाईन पंचायतीचे प्रल्हाद वरंदानी, सुरेश भोजवानी, बडते कदमचे महेश हसीजा, विजय मनुजा, व्हीएसएसचे संस्थापक विनोद (गुड्डू) चांदवानी, अध्यष धरम खटवानी, उपाध्यश सुनील सभवानी, सचिव सुनील मोटवानी, कोषाध्यक्ष दीपक कुकरेजा, अजय गोपलानी, श्याम वाधवानी, भूषण रमचंदानी, प्रदीप कोडवानी, प्रकाश कोडवानी, अविनाश जयसिंघानी, मोनू शिवदासानी, सुमित वाधवानी, दीपक गलानी, संजय तेजवानी, किशन नागवानी, कुणाल वाधवानी, सिद्धार्थ गोपलानी, दीपक आहूजा, रोहित चांदवानी, रितेश नागदेव, सुमित सत्तानी, डॉ. सुवर्णा हुबेकर, किशोर तलरेजा आदि उपस्थित होते. या भव्य रक्तदान शिबिरात सामाजिक कार्यकर्ते आशिष ठकरानी, रिंकू आसवानी, बाबा नितानी, मनीष वाधवानी, रवी बोडाणी आदी सामाजिक संस्था उपस्थित होत्या. जवळपास १00 हून अधिक रक्तदूतांनी रक्तदान केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवा पदाधिकारी व सदस्य तसेच समाज बांधवानी सहकार्य केले.
भगवान झुलेलाल जन्मोत्सवानिमित्त रक्तदान शिबिर
RELATED ARTICLES