Friday, July 19, 2024
Google search engine
HomeUncategorizedमहसूल विभागातील कर्मचाऱ्यांच्या समस्या मार्गी लावणार : जिलाधिकारी गोतमारे

महसूल विभागातील कर्मचाऱ्यांच्या समस्या मार्गी लावणार : जिलाधिकारी गोतमारे

गोंदिया. मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या निकाली काढण्यासाठी दि. 6 ऑगष्ट 2023 ला कास्ट्राईब कर्मचारी महासंघ जिल्हा गोंदिया चे जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश वासनिक यांच्या नेतृत्वात चिन्मय गोतमारे जिल्हाधिकारी जिल्हा गोंदिया यांच्या सोबत अधिकृत बैठक संपन्न झाली. सर्व समस्या निकाली काढण्याचे आश्वासन गोतमारे यांनी दिले. यावेळी स्मिता बेलपत्रे निवासी उपजिल्हाधिकारी उपस्थित होते.
मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे प्रश्न व समस्या निकाली काढण्यासाठी नियमित त्रैमासिक बैठक घेण्यात यावी, विभागवार कर्मचाऱ्यांची बिंदू नामावली अद्यावत करण्यात यावी, 31मार्च 2023 अखेरपर्यंत मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे सरळ सेवा तसेच पदोन्नती अनुशेष भरण्यात यावा, वर्ग 4 मधील कर्मचाऱ्यांचे वर्ग 3 मध्ये पदोन्नती करण्यात यावी, आश्र्वासित प्रगती योजना सर्व कर्मचाऱ्यांना देण्या संदर्भाने कार्यवाही करण्यात यावी, अपंग कर्मचारी अनुशेष भरण्यात यावा, अनुकंपा तत्वावर रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी, कोतवाल व पोलीस पाटील यांची रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी, मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवाल वेळीच बरोबर लिहिण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात यावे, वर्ग 1,2, 3 व वर्ग 4 चे अधिकारी/कर्मचारी यांचे संवर्ग निहाय मंजुर पदे, रिक्त पदे,व कार्यरत पदे यांची माहिती देण्यात यावी, मागास कक्ष स्थापन करण्यात यावा, सेवानिववृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांचे प्रलंबित सेवानिवृत्त प्रकरणे तसेच सेवानिवृत्ती फाईल 6 महिन्यापूर्वी मंजुर करण्या संदर्भाने कार्यवाही करण्यात यावी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपदान, अंशराशिकरण, रजारोखिकरण गटविमा, भविष्य निर्वाह निधी अविलंब देण्यात यावी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ओळखपत्र देण्यात यावे, आदी मागण्यांचा समावेश होता.
शिष्टमंडळात कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश वासनिक,शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय उके, महासंघाचे कार्याध्यक्ष श्रीकांत जनबंधू, सरचिटणीस प्रवीण गजभिये, भरत वाघमारे, सिध्दार्थ भोतमांगे,आनंद बोरकर जितेंद्र बोरकर, रितेश शहारे, निशिकांत मेश्राम, अमोल बडोले व अन्य पदाधिकारी लिपिक बिसेन उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments