Tuesday, June 25, 2024
Google search engine
HomeUncategorizedमुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानथंम यांची प्राथमिक आरोग्य केंद्र रावणवाडीला आकस्मिक भेट

मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानथंम यांची प्राथमिक आरोग्य केंद्र रावणवाडीला आकस्मिक भेट

गोंदिया. 13 एप्रिल 2024 रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानथंम यांनी दुपारी 1.30 वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र रावणवाडीला आकस्मिक भेट देवुन आरोग्य संस्थेत देत असलेल्या आरोग्य सेवा व सुविधाची पाहणी केली.
भेटी दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्रातील आतील व बाहेरील परिसराची स्वच्छता,बाह्यरुग्ण सेवा (ओपीडी) दरम्यानच्या वेळेत मिळत असलेल्या रुग्ण सुविधा, क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचे नियमित गावनिहाय भेटीचे नियोजन,पर्यवेक्षांनी उपकेंद्रांना भेटी, सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचा आढावा,औषधी साठा,शासकिय निवास्थान ई. विविध बाबींचा आढावा घेवुन मुख्यालय राहणे,रुग्णसुविधा गुणवत्तापुर्वक देणे,सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे करण्यात यावी, कर्मचारी यांनी कर्तव्यस्थानी ओळखपत्र व ड्रेस कोड नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, आरोग्य संस्थाचे रेकॉर्ड अद्यावत करुन मुख्यालयी राहण्याच्या सुचना यावेळी देण्यात आल्या.एकंदरीत प्राथमिक आरोग्य केंद्र रावणवाडी येथे अधिकारी व कर्मचारी यांचे मार्फत देण्यात येणार्या आरोग्य सेवा बाबत समाधान व्यक्त करुन कौतुक केले.
भेटि दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्र रावणवाडीचे वैद्यकिय अधिकारी डॉ.नंदिनी रामटेककर,आरोग्य सहाय्यक चव्हाण,फार्मासिस्ट ज्योती जगने, आरोग्य सहाय्यिका भानारकर,कंत्राटी एल.एच.व्ही. वैद्य, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी शितोडे, आरोग्य सेविका सुरेखा चांदेकर, पानतावणे, मनिषा नंदेश्वर, ब्रदर लवकुश चव्हाण, डाटा एन्ट्री ऑपरेटर निलकमल मेश्राम,एचएलएल लँबचे राहुल,परिचर नेवारे व सोरले,स्वीपर मुकेश ई.उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments