गोंदियाचे ‘मिल्खा सिंग’साठी सरसावला विधानसभा ग्रुप
गोंदिया. शहरातील धावक मुन्नालाल यादव यांना गोंदियाचे ‘मिल्खा सिंग’ नावाने ओळखल्या जाते. यादव दुबई येथे आयोजित आंतरराष्ट्रीय दौड स्पर्धेत सहभाग घेत आहे. मात्र, त्यांची परिस्थिती हलाखीची असून दुबई जाण्याकरिता पैसे नसल्याची चिंता सतावत होती. मात्र, दुसऱ्यांच्या सेवेसाठी धावणारा सोशल मीडियावरील गोंदिया विधानसभा व्हॉट्सअॅप ग्रुपच्या सदस्यांनी लोकवर्गणी करून मदत करण्याचे ठरविले. दरम्यान, काही तासात ग्रुपच्या सदस्यांनी पुढे येऊन 55 हजार 555 रूपये जमा केले. दरम्यान, शनिवार, 9 सप्टेंबर रोजी 55555 हजारांचा धनादेश मुन्नालाल यादव यांच्या ग्रुपच्या सदस्यांनी सुपूर्द केले.
शहरातील धावक मुन्नालाल यादव यांनी अनेक राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दौड स्पर्धेत सहभाग घेऊन गोंदिया जिल्ह्याचा नाव लौकिक केले आहे. त्यांची वय 80 झाली असून सुद्धा ते नियमित दौडचा अभ्यास करत असून अनेक किलोमीटर धावतात. मात्र, त्यांची वय 80 झाली असून सुद्धा ते गोंदिया जिल्ह्याच्या नाव लौकिक करण्यासाठी अनेक स्पर्धेत सहभागी होतात. त्यातच ऑक्टोबर महिन्यात दुबई येथे आंतरराष्ट्रीय दौड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत ते सहभाग घेणार आहेत. मात्र, त्यांची परिस्थिती हलाखीची असून दुबई येथे जाण्याकरिता त्यांच्याजवळ इतके पैसे नाही. त्यामुळे या स्पर्धेत कसा सहभाग घेणार याची चिंता त्यांना सतावत होती. दरम्यान, गरीब, गरजू लोकांच्या मदतीसाठी सदैव धावून येणाऱ्या शहरातील सोशल मीडियावर सक्रीय राहणारा व्हॉट्सअॅपमधील गोंदिया विधानसभा ग्रुपच्या सदस्यांनी त्यांची मदत करण्याचे ठरविले. याकरिता ग्रुप अॅडमिन पॅनलने पैसे संकलन केले असता केवळ 5 तासात 55 हजार 555 रूपयांची रकम संकलन करण्यात आले. दरम्यान, गोंदिया विधानसभा ग्रुपच्या सदस्यांनी शनिवार, 9 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता मुन्नालाल यादव यांना 55 हजार 555 रूपयांचे धनादेश श्री हनुमान मंदिर येथे सुपूर्द करण्यात आला. तसेच सामूहिक हनुमान चालिसाचे पठण करून ते दुबईत आयोजित स्पर्धेत यशस्वी होऊन यावे, याकरिता भगवान चरणी प्रार्थना करण्यात आली.
मुन्नालाल यादव यांना स्पर्धेत सहभाग घेण्याकरिता केली 55555 हजारांची मदत
RELATED ARTICLES