गोंदिया : गंगाझरी पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सेजगावकला येथील मुलीला कॉल केल्याच्या कारणावरून झालेल्या वादात दोन गटांत हाणामारी झाली. ही घटना ६ मार्चच्या रात्री ९:३० वाजता घडली. या घटनेत पाचजण जखमी झाले. दोन गटांतील चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
सेजगावकला येथील महेंद्र गणराज रिनाईत (३५) , त्यांचे वडील गणराज रिनाईत व त्यांच्या आईला दोन आरोपींनी मारहाण केल्याची घटना ६ मार्च रोजी रात्री १०:३० वाजता घडली. आरोपीला तू माझ्या पुतणीला फोन का केला, असे म्हटले असता, आरोपीने त्यांच्याशी वाद घातला. या वादात काठीने तिघांना मारून जखमी केले. तक्रारीवरून गंगाझरी पोलिसांनी भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ३४ अन्वये गुन्हा नोंद केला आहे. तपास पोलिस हवालदार रामेश्वर बर्वे करीत आहेत. दुसऱ्या गटातील मनोज कैलाश पारधी (२२) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मनोज आपल्या मित्रासह घराकडे जात असताना गावाबाहेर कॅनॉलजवळ दोन आरोपींनी भांडण केले. यात दोघांना मारहाण करण्यात आली. तक्रारीवरून गंगाझरी पोलिसांनी दुसऱ्या गटातील आरोपींवर भादंवि कलम ३२४,३४ अन्वये गुन्हा नोंद केला आहे. तपास पोलिस हवालदार रामेश्वर बर्वे करीत आहेत.