Saturday, June 22, 2024
Google search engine
HomeUncategorizedमॉडीफाईड डी. जे. वाहनांवर शहर पोलिसांची कारवाई; दोन्ही वाहनांवर दंड देखील आकारला

मॉडीफाईड डी. जे. वाहनांवर शहर पोलिसांची कारवाई; दोन्ही वाहनांवर दंड देखील आकारला

गोंदिया : मो. हजरत बाचा ताजउदीन यांच्या जन्मदिवसा निमीत्त चादर संदल कार्यक्रमात गोंदिया शहरात वेगवेगळ्या ठिकाणावरुन जुलुस काढण्यात आले होते. या जुलूसातील दोन डीजे चालकांवर गोंदिया शहर पोलिसांनी २७ जानेवारी रोजी कारवाई केली आहे. त्या दोन्ही वाहनांवर दंड देखील आकारला आहे.या जुलुसमध्ये जगदंबा धुमाल ग्रुप ठाणा येथील डि.जे. वाहन क्रमांक एम.एच. ४० बी.जी. २७७२ या मालवाहकाने वाहनावर परवान्याशिवाय डि.जे. वाद्य बसवून असुरक्षीतपणे लोकांचे चढणे उतरणे तसेच वाहनाचे बाहेर डि.जे. बॉक्स काढून वाहतूक करतांना मिळाला.
या वाहनावर कलम १०८, १७७, २२९(२), १७७, १९८ मोटार वाहन कायदा अंतर्गत कारवाई करुन २ हजार ५०० रूपये दंड आकारण्यात आला आहे. तसेच के.जी.एन. धुमाल पार्टी राजनांदगाव वाहन क्रमांक सी.जी. ०७ सी.ए. १५२३ हे वाहन विना परवाना मॉडीफाईड करुन वाहनाचे बाहेर डि.जे. वाद्य व लाईटींग लावली होती. त्या वाहनासंदर्भात उपप्रादेशिक परीवहन अधिकारी गोंदिया यांना पत्र देवून डी.जे वाहनावर दंड आकारण्याबाबत कळविले होते. उपप्रादेशिक परीवहन अधिकारी गोंदिया यांनी त्या वाहनावर १२ हजार ५०० रूपये दंड आकारला आहे.ही कारवाई पोलीस अधिक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधिक्षक नित्यानंद झा, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे, शहरचे ठाणेदार चंद्रकांत सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गराड, पोलीस उपनिरीक्षक शरद सैदाने व पोलीस पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments