Tuesday, September 17, 2024
Google search engine
HomeUncategorizedरेखलाल टेंभरे यांची एमआयडीसी गोरेगाव येथे त्वरित सुविधा पुरविण्याची मागणी

रेखलाल टेंभरे यांची एमआयडीसी गोरेगाव येथे त्वरित सुविधा पुरविण्याची मागणी

गोंदिया : गोरेगाव येथे एमआयडीसी स्थापना होऊन २५ वर्षे झाली. गेल्या २५ वर्षांत एमआयडीसी गोरेगाव चा विकास झाला नसुन एमआयडीसी गोरेगाव चे परीसर दारू पिण्याचे, डकेती व वलथान कामे करण्याचे परिसर झाले आहे. व गुंड प्रवृत्ती च्या लोकांचे वास्तव्य झाले आहे. व एमआयडीसी परिसरात पाणी, रस्ते, सुरक्षा रक्षक, स्ट्रीट लाईट व पार्किंग ची व्यवस्था नाही. परंतु एमआयडीसी चे अधिकारी या महत्वपूर्ण बाबींकडे दुर्लक्ष करीत आहेत.

रेखलाल टेंभरे म्हणाले की कारखानदार व व्यापारी कोणताही उद्योग/व्यापार करण्यासाठी पैशाची कितीही जोखीम घेण्यास तयार असतात. परंतु त्यांना साधने-सुविधा जसे की पाणी, रस्ते,विज, पार्किंग व अन्य आवश्यक व्यवस्था उपलब्ध हव्या असतात. करीता एमआयडीसी गोरेगाव येथे स्ट्रीटलाईट, वाहतूक व इतर सर्व सुविधा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी रेखलाल टेंभरे यांनी एमआयडीसी चे प्रादेशिक अधिकारी यांना केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments