3,80,850 रुपयांचा दंड वसूल
गोंदिया : जिल्हा वाहतूक पोलिसांनी 23 जानेवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या 902 वाहनचालकांवर कारवाई करीत 3 लाख 80 हजार 850 रुपयांचा दंड वसूल केला. रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी वाहतुकीचे नियम आहे. वाहन परवाना मिळविण्याकरिता याच नियमांच्या आधारे परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर परवाना दिला जातो. मात्र अल्पवयीन चालकांसह अनेक परवानाधारक चालकही वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन करतात.
अशा वाहनचालकांवर वाहतूक विभागाद्वारे कारवाई करुन दंड वसूल केला जातो. मात्र त्यानंतरही जिल्ह्यात अनेक चालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना दिसतात. याविरोधात वाहतूक विभागाद्वारे विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. यांतर्गत 23 जानेवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान राबविण्यात आलेल्या मोहिमेत वाहतूकीचे नियम न पाळणार्या, वाहतुकीचे नियमांचे उल्लंघन करणाºया वाहन चालकांवर विषेशत: विना लायसन्स वाहन चालविणारे वाहन चालक, विना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसविणे, विना सीट बेल्ट, कर्कश हॉर्न वाजविणारे, अडथळा निर्माण होईल अशी पार्किंग करणे, पोलिसांचा इशारा न पाळणे आदींवर कारवाई करून 484 पेड केसेस, 436 अनपेड केसेस अश्या एकूण 920 वाहतूक कारवाया करण्यात आल्या असून 3,80,850 रुपये दंड आकारण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे वाहतूक पोलिस वाहनावर फॅन्सी नंबर प्लेट लावणार्या वाहनांचे नंबर प्लेट काढून घेवून जप्तीची कारवाई करीत आहेत. ही कारवाई वरिष्ठांच्या निर्देश जिल्हा वाहतूक शाखेचे पोलिस निरिक्षक महेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार व पथक यांनी सदरची कारवाई केली आहे.
रवि ठकरानी ( प्रधान संपादक)
93593 28219