गोंदिया : महाराष्ट्रातील स्मार्ट प्रकल्पांतर्गत दिनांक 18 मार्च 2023 ते 27 मार्च 2023 पर्यंत शेतकरी अभ्यास दौरा रेखलाल टेंभरे यांच्या मार्गदर्शनात यशस्वी संपन्न झाला.
शेतकरी उत्पादक कंपन्याचे 40 संचालक/शेतकरी व चार माविम समूहाच्या 20 शेतकऱ्यांच्या समूह केरळच्या शेतीविषयक अभ्यास दौऱ्यावर केरळला गेला होता. त्यात रेखलाल टेंभरे (डायरेक्टर जीडीसीसी बॅंक, गोंदिया), मुनेश्वर ठाकूर (कृषी अधिकारी गोंदिया), सिता राहांगडाले (माजी जि.प.सदस्य), साहेबलाल कटरे (अध्यक्ष भाजप, गोरेगाव), मोरेश्वर राहांगडाले (संचालक नेहरू सह. धान गिरणी मर्या.), मुनेश्वर राहांगडाले (विकसित शेतकरी), मेघनाथ टेंभरे (कटंगी), गणराज पटले, हुमराज बावणकर, कैलास राहांगडाले, व्यंकट बिसेन, लक्ष्मी डहाके (कृषी सहाय्यक), लक्ष्मी राहांगडाले (कृषी सहाय्यक), मुन्ना बिसेन (माविम अधिकारी), व नितेश लिल्हारे (माविम अधिकारी) आदी शेतकरी केरळ दौऱ्यावर उपस्थित होते.
केरळ विकसित राज्य आहे. केरळमध्ये ज्या पिकांचे उत्पादन घेतले जाते त्याच पिकांपासून बनलेल्या पदार्थांचे तिथे जास्त प्रमाणात सेवन केले जाते. आणि म्हणून हे राज्य शेतीच्या बाबतीत विकसित असल्याचे कारण समजून आले. तिथे धान्य, नारळ, केळी, आंबा व मसाले ही प्रमुख पिके जास्त प्रमाणात घेतली जातात व या पिकांपासून तयार झालेल्या पदार्थांचेच तिथे जास्त सेवन केले जाते. केरळमध्ये वर्षाला मुंडूगम, वीरप्पू व पुंचा अशा तीन सिजन मध्ये धानाचे पिके घेतली जातात. तिथे धान्याची 90 दिवसाची क्रॉप त्यांनी विकसित केली आहे. तिथे लाल तांदूळचे सुद्धा पिक घेतले जाते व विशेष म्हणजे जेवढा पाणी गहू उत्पादनाला लागतो तेवढ्या पाण्यामध्ये धानाचा पिक घेतला जातो. विदर्भातील शेतकऱ्यांनी शेतीत उत्पादित केलेल्या मालावर प्रक्रिया करून पॅकिंग व ब्रांडिग करून येथील उत्पादने केरळ व इतर राज्यात विक्री करुन शेतकऱ्यांचे शेतीपासून चे उत्पन्न वाढविण्याचे निर्धार रेखलाल टेंभरे यांनी केले.
विदर्भातील शेतकी उत्पादने केरळ व इतर राज्यात विक्रीची व्यवस्था निर्माण करुन शेतकऱ्यांना फायदा पोहोचविणार : रेखलाल टेंभरे
RELATED ARTICLES