गोंदिया. रोवणी झालेल्या पिकांना खत देत असलेल्या शेतकऱ्याचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाल्याची शुक्रवारी (दि.२८) दुपारच्या सुमारास अर्जुनी मोरगाव तालुक्यातील चान्ना कोडका येथे घडली. गोविंदा सोमा भोयर (६२) रा. चान्ना कोडका असे वीज कोसळून मृत्यु झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
गोविंदा भोयर यांची चान्ना कोडका शेतशिवारात शेती आहे. शुक्रवारी दुपारच्या सुमारास ते रोवणी झालेल्या खत मारण्यासाठी गेले होते. दरम्यान दुपारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. दरम्यान शेतात खते टाकत असलेल्या गोविंदा भोयर यांच्या अंगावर वीज कोसळली. त्यांच्या शेतालगत असलेल्या शेतकऱ्यांनी गोविंदा भोयर यांना नवेगावबांध येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. दरम्यान उपचार घेत असताना मृत्यु झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आहे.
वीज कोसळून शेतकरी ठार
RELATED ARTICLES