गोंदिया : तिरोडा स्थानिक शहिद मिश्रा विद्यालयात कार्यरत क्रीडा शिक्षकाने वर्ग दहावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थिनीशी अश्लिल चाळे केले. या प्रकाराची माहिती मिळताच पालकांनी त्या शिक्षकाविरुद्ध चांगलाच असंतोष व्यक्त केला. दरम्यान तिरोडा पोलिस ठाण्यात शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १६ ते १९ जानेवारी दरम्यानची आहे. सुनिल आत्माराम शेंडे (५२) असे आरोपीचे क्रीडा शिक्षकाचे नाव आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. शिक्षकच शिक्षण क्षेत्राला काळीमा फासत असतील तर विद्यार्थिनीच्या सुरक्षेचे प्रश्न संपुष्टात येणार, असा सवालही पालकांकडून उपस्थित केला जात आहे.
तिरोडा येथील शहिद मिश्रा विद्यालयात वर्ग १० वीमध्ये पीडित विद्यार्थिनी शिक्षण घेत आहे. पीडित विद्यार्थिनीला एनसीसी सराव करण्यासाठी १६ जानेवारी रोजी सकाळी शालेय परिसरात आली असतांना, क्रीडा शिक्षक सुनिल शेंडे यांनी तिची खेळ काढली. तसेच सायंकाळी देखील पुन्हा तिच्याशी अश्लिल चाळे केले. एवढेच नव्हेतर या घटनेची माहिती इतरास देवू नये, अशी
धमकी सुद्धा दिली. त्यातच १९ जानेवारी रोजी पुन्हा त्या विद्यार्थिनीला क्रीडा कक्षात बोलावून तिच्याशी अश्लिल चाळे केले. दरम्यान सदर विद्यार्थिनीने या प्रकाराची माहिती पालकांना दिली. यामुळे क्रीडा शिक्षक सुनिल शेंडेच्या करामतीचे बिंग फुटले. दरम्यान या घटनेची चर्चा सुरू झाली. यावर सुनिल शेंडे याने पीडित मुलीच्या घरी माफी मागण्याचा प्रयत्न केला. मात्र पीडित मुलीच्या पालकांनी त्याला हाकलून लावले. तिरोडा पोलिसात आरोपी शिक्षक सुनिल शेंडे विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीनुरूप आरोपी विरुद्ध कलम ७४, ७५(१) (१), भारतीय न्यायसंहिता व सहकलम ८, १२ लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे तिरोडा तालुक्यासह जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. पुढील तपास पोनि. अमित वानखेडे यांच्या मार्गदर्शनात उपपोनि. दिव्या बरळ करीत आहेत.
शिक्षकाचे विद्यार्थिनीशी अश्लील चाळे, तिरोडा शहरातील नामवंत शाळेतील प्रकार
RELATED ARTICLES






