गोंदिया : सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम पंचायत वडेगाव येथील सरपंच, उपसरपंच सह दोन सदस्य 70 हजार रुपयाची लाच प्रकरणी एसिबी च्या जाळ्यात अडकले आहेत. गोंदिया जिल्हा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 18 ऑगस्ट रोजी कारवाई करीत आरोपी विरुद्ध डूग्गीपार पोलिस स्टेशन येथे गुन्ह्याची. नोंद केली आली आहे.
तक्रारदार वय वर्ष 52, रा. देवरी हे बांधकाम साहित्य पुरवठा धारक असून त्यांनी राष्ट्रीय ग्रामीण योजने अंतर्गत ग्रामपंचयात वडेगाव येथे सन 2020 – 21 मधे ग्रामपंचयात निवेदे नुसार विविध कामा करीता बांधकाम साहित्य पुरवठा केला होता.
तक्रारदार यांनी पुरावठा केलेल्या बांधकाम साहित्याचे मंजूर बिलाचे चेक देने करीता यातील गैर अर्जदार यांनी 15 लाख 55 हजार 696 रुपये रकमेवेर पांच टक्के प्रमाणे 75 हजार रूपये लाच रकमेची मागनी करुण तडजोडी अंति 70 हजार रुपये रकमेची पंचासमक्ष मागणी करून लाच रक्कम प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. सदर पडताळणी दि. 10 ऑगस्ट रोजी करण्यात आली.
आरोपी लोकसेवक यांनी आपल्या पदाचा दुरूपयोग करून स्वताच्या लाभाकरीता गैर वाजवी फायदा मिळविण्याचा प्रयत्न केला. यात आरोपी नामे 1) रिना हेमंत तरोने वय 32 वर्ष पद – सरपंच, 2) दिनेश सुनील मुनीश्वर, वय 27 वर्ष पद – उपसरपंच, 3) मार्तंड मंसाराम मेंढे वय 38 वर्ष पद – ग्रा.प. सदस्य, 4) श्रीमती लोपा विजय गजभिये वय 50 वर्ष, पद – ग्रा.पं. सदस्य, सर्व ग्राम पंचायत वडेगाव, तालुका सडक अर्जुनी येथील रहिवासी असून यातील 1, 2, 3, यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन डुग्गीपार येथे गुन्हा नोंद करण्यात आले आहे.
सापळा कार्यवाही पथक पो. नि. उमाकांत उगले, पो. नि. अतुल तवाडे, पो. हवा. संजयकुमार बोहरे, मंगेश काहालकर, नापोशि संतोष शेंडे, नापोशि संतोष बोपचे, अशोक कापसे, नापोशि प्रशांत सोनवाने, कैलाश काटकर, नापोशी संगीता पटले, चालक नापोशि दिपक बाटबर्वे यांच्या पथकाने सदर कारवाई केली आहे.
सरपंचासह तीन अडकले एसिबी च्या जाळ्यात, 70 हजार रुपयाची लाच प्रकरण
RELATED ARTICLES