मोहीम शनिवार आणि रविवार
गोंदिया : जिल्ह्यातील अपघाताचे वाढते प्रमाण, लक्षात घेऊन नागरिकांमध्ये विशेषतः गोंदिया शहरातील नवंतरुण तरुणी आणि जनतेमध्ये वाहतुकी चे नियमांची जनजागृती व्हावी. जिल्ह्यातील वाहतुकीला शिस्त लागावी वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी याकरीता पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, यांनी पोलीस अधीक्षक, कार्यालय गोंदिया येथे वरिष्ठ अधिकारी यांचे आयोजित बैठकीत वाहतुकीच्या नियमांची अंमलबजावणी करण्याकरीता जिल्ह्यांत हयगयीने, लापरवाहिने बेदर्कारपणे गाडी चालवून लोकांचे जीवितास धोका निर्माण करणाऱ्याविरुद्ध कलम 279 अंतर्गत कारवाईची धडक मोहीम राबविण्याबाबत निर्देशीत करून सर्व ठाणे प्रमुख, जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा, यांना आदेशित करण्यात आले आहे.
या अनुषंगाने पोलीस अधीक्षक, श्री. निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया, तिरोडा, देवरी, आमगाव यांचे मार्गदर्शनाखाली संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध जसे हयगयीने, लापरवाहीने, बेदरकारपणे, विरूध्द दिशेने गाडी चालविणे, अश्या विरुद्ध कलम 279 भादवी अन्वये कारवाई करण्याची मोहीम शनिवार आणि रविवार ला राबविण्यात येणार आहे.
या अनुषंगाने जिल्ह्यांत वाहतूक नियमाचे पालन करण्याबाबत जनजागृती करणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे बेशिस्त वाहन चालक, हयगयीने वाहन चालविणाऱ्या विरोधात कठोर कारवाई करणे, अशा प्रकारच्या कारवाया केल्या जाणार असून वारंवार सूचना देऊनही काही वाहन चालक वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन करीत आहेत. अशा वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील विशेषतः गोंदिया शहरातील बेशिस्त वाहतूक करणाऱ्या विरूध्द कलम 279 भादंवि अन्वये कारवाई करण्यात येवून गुन्हे नोंदविण्यात येणार आहेत. एकंदरीत गोंदिया जिल्ह्यातील विशेषतः गोंदिया शहरातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी व गोंदियाकरांचा त्रास कमी करण्याकरिता गोंदिया जिल्हा प्रशासन कटिबध्द असून जिल्हयातील सर्व पो. ठाणे, वाहतूक शाखा, जिल्ह्यातील वाहतूक रहदारीचे योग्य नियंत्रण ठेवण्यासाठी उपायोजना करून सदैव प्रयत्नशील आहे. गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांना, विशेषतः अल्पवयीन मुले- मुली, शाळकरी विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांना वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अन्यथा वाहतूकीचे नियमांचे उल्लंघन करून वाहणे हयगयीने, लापरवाहीने, बेदरकारपने, चालवून लोकांचे जीवितास धोका निर्माण करणाऱ्याविरूध्द मोहिमे अंतर्गत कारवाईस सामोरे जावे लागू शकते. स्वतःचा व इतरांचा जिवितांचा विचार करून वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.
हयगयीने वाहतूक, होणार कारवाई : पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे
RELATED ARTICLES